कोरोनाचं थैमान, कबुतरांना उघड्यावर दाणे टाकणे गुन्हा ठरवला जावा; मुख्यमंत्र्यांकडे शिवसेना नेत्याची मागणी

कोरोनाचं थैमान, कबुतरांना उघड्यावर दाणे टाकणे गुन्हा ठरवला जावा; मुख्यमंत्र्यांकडे शिवसेना नेत्याची मागणी

शुभा राऊळ यांनी उद्धव ठाकरे यांना एक पत्रही लिहिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 9 एप्रिल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन पातळीवर विविध निर्णय घेतले जात आहेत. अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक नवी मागणी करण्यात आली आहे. 'रस्त्यावर थुंकणे हा जसा गुन्हा आहे तसंच उघड्यावर कबुतरांना दाणे टाकणे याला गुन्हा ठरवले जावे,' अशी मागणी मुंबईच्या माजी महापौर डॉक्टर शुभा राऊळ यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याबाबत शुभा राऊळ यांनी उद्धव ठाकरे यांना एक पत्रही लिहिलं आहे.

'कोरोनाचा संसर्ग हा फुफुसे कमकुवत असलेल्या लोकांना सर्वात आधी होत असल्याचं दिसून येत आहे. कबुतरांना उघड्यावर दाणे टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणावर बॅक्टेरियल इन्फेक्शन होते. त्यामुळे अनेकांना अस्थमा आणि ब्रोंकाइटिस टेस्ट सारखे आजार जडतात. म्हणूनच कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी उघड्यावर थुंकणेप्रमाणेच उघड्यावर कबुतरांना दाणे टाकणे हे गुन्हा ठरवले जावे,' अशी मागणी शुभा राऊळ यांनी केली आहे.

हेही वाचा - धारावीतल्या 7 लाख 50 हजार लोकांचं 10 दिवसांमध्ये स्क्रिनिंग होणार

'ही मागणी मी अनेक डॉक्टरांच्या मागणीवरून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवत आहे. त्याला आधार म्हणून 2016 चा हायकोर्टाचा निर्णयही त्याच्यासोबत जोडला आहे,' अशी राऊळ यांची भूमिका आहे. त्यामुळे याबाबत आगामी काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेमका काय निर्णय घेतात, हे पाहावं लागेल.

संपादन - अक्षय शितोळे

First published: April 9, 2020, 5:51 PM IST

ताज्या बातम्या