मुंबई, 29 सप्टेंबर : देशातील ग्रामीण आणि शहरी भागात एक सर्व्हे करण्यात आला असून त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. येत्या काही दिवसांत सण, लोकांचं एकत्र येणं आणि हिवाळा या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी 5T या सूत्राची अंमलबजावणी करावी लागणार आहे. यामध्ये टेस्ट, ट्रॅक, ट्रेस, ट्रीट आणि टेक्नॉलॉजी याचा समावेश आहे. तसंच शारीरिक अंतर ठेवणे, मास्क घालणे, खोकताना काळजी घेणं गरजेचं असल्याचं सांगण्यात आलं आहे.
कुठे घेण्यात आला हा सर्व्हे?
देशभरातील 21 राज्यातील 700 गावं आणि 70 जिल्ह्यात हा सर्व्हे करण्यात आला आहे. 17 ऑगस्ट ते 22 सप्टेंबरपर्यंत या कालावधीत हा सर्व्हे घेण्यात आला. वयस्क, लहान मूल, गरोदर स्त्रिया, हृदयरोग, डायबिटीस, श्वसनाचे आजार असलेल्यांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे.
मुंबईबाबत धक्कादायक आकडेवारी
इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चने (ICMR) दुसरा राष्ट्रीय सीरो सर्व्हे (Sero Survey)अहवाल जारी केला आणि त्यातून मुंबईतील (mumbai) कोरोनाबाबतची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
पहिल्या सिरो सर्व्हेमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीलाच तब्बल 64 लाख लोकांना कोरोना संक्रमण झाल्याचं समोर आलं. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचं एकही प्रकरण समोर आलं नाही. त्या जिल्ह्यांमधील लोकांना कोरोना होऊन गेल्याचं समजलं आणि आता दुसऱ्या सीरो सर्व्हेमध्ये ग्रामीण भागापेक्षाही शहरी भागातील झोपडपट्टी परिसरात सर्वात जास्त लोकांमध्ये अँटिबॉडी सापडल्या आहेत. झोपडपट्टी परिसरात 10 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या प्रत्येकी पंधरावा व्यक्ती कोरोनाला सामोरा गेला आहे. म्हणजेच त्याला कोरोनाव्हायरसची लागण झाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.