24 तासांत PMC बॅंकेच्या आणखी एका खाताधारकाचा मृत्यू, अडकले एवढे रुपये

24 तासांत PMC बॅंकेच्या आणखी एका खाताधारकाचा मृत्यू, अडकले एवढे रुपये

पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बॅंकेच्या आणखी एका खाताधारकाचा मंगळवारी मृत्यू झाला.

  • Share this:

मुंबई,15 ऑक्टोबर: पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बॅंकेच्या आणखी एका खाताधारकाचा मंगळवारी मृत्यू झाला. 59 वर्षीय फत्तोमल पंजाबी यांचा हार्टअटॅकने मृत्यू झाला आहे. नातेवाईक दीपक पंजाबी यांनी सांगितले की, पीएमसी बॅंकेत फत्तोमल पंजाबी यांचे 2 हजार रुपये होते. ते पैसे त्यांनी काढता येत नव्हते. 24 तासांत ही पीएमसीच्या खातेदाराचा मृत्यू झाल्याची ही दूसरी घटना आहे. याआधी ओशिवारा येथील तारापोरेवाला गार्डन राहणारे संजय गुलाटी यांचा मृत्यू झाला होता.

बँकेत अडकले 90 लाख रुपये...

संजय गुलाटी यांनी पीएमसी बँकेतील घोटाळ्याविरोधात सोमवारी आंदोलनात सहभाग नोंदवला होता. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या परिवाराचे बँकेत तब्बल 90 लाख रुपये जमा होते. त्यांना आपल्या हक्काचा पैसा काढता येत नाही. दरम्यान, बँकेच्या खातेदारांनी सोमवारी केलेल्या निदर्शने केले. संजय गुलाटी देखीस आंदोलनात सहभागी झाले होते. प्रदर्शनानंतर दुपारी साडेतीन वाजता ते घरी आले आणि झोपी गेले. सायंकाळी पावणेपाच वाजता जेवण करतेवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

आधी गेली होती नोकरी..

संजय गुलाटी हे जेट एअरवेजमध्ये नोकरीला होते. काही महिन्यांपूर्वी त्यांची नोकरी गेली. आता त्यांना बचत केलाला पैसा बँकेत अडकला आहे. संजयला फक्त थायरॉइडची समस्या होती.

नेमके काय आहे प्रकरण?

35 वर्षे जुन्या पीएमसी बॅंके लाखों खातेधारकांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. बॅंकेच्या एनुअल रिपोर्टनुसार, बॅंकेत खातेधारकांचे 11 हजार 617 कोटी रुपये जमा आहेत. यात टर्म डिपॉजिट 9 हजार 326 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. तर डिमांड डिपॉजिटच्या स्वरुपात 2 हजार 291 कोटी रुपये जमा आहेत. बँकेतील कर्ज घोटाळ्याप्रकरणी आरबीआयने गेल्या महिन्यात बँकेवर 6 महिन्यांसाठी निर्बंध लादले होते. याअंतर्गत खातेदारांना फक्त 1000 रुपये काढण्याची मुभा देण्यात आली होती. यानंतर ही मर्यादा वाढवून 10 हजार नंतर 25 हजार आणि सोमवारी 40 हजार रुपये करण्यात आली आहे. या घोटाळ्यामुळे हजारो खातेधारकांचे पैसे बँके अडकले आहेत. आरबीआय आदेशाविरोधात अनेक खातेदार आंदोलन करत आहेत.

बाळासाहेबांच्या विचारांचा नातवाला विसर? आदित्य ठाकरेंचा पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 15, 2019 09:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading