Home /News /mumbai /

वडील केंद्रात मोठे अधिकारी तर आई नगरसेविका, पोराच्या मागे होते 3 राज्यांचे पोलीस, कारनामा ऐकून तुम्ही व्हाल हैराण!

वडील केंद्रात मोठे अधिकारी तर आई नगरसेविका, पोराच्या मागे होते 3 राज्यांचे पोलीस, कारनामा ऐकून तुम्ही व्हाल हैराण!

निखिलच्या अटकेमुळे जवळपास तीन राज्यांचे पोलीस आणि राज्यातील २० पेक्षा जास्त पोलीस स्टेशनमधील पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडलाय

मुंबई, 27 जानेवारी : मुंबईतील वेगवेगळ्या परिसरात असलेल्या ज्वेलर्सच्या दुकानात जाऊन बनावट मोबाईल ऐपद्वारे एनईएफटीच्या माध्यमातून पैसे ट्रान्स्फर केल्याचे भासवीत कोट्यावधी रुपयांचं सोनं घेऊन लुबाडणाऱ्या निखिल दुर्गेश सुमन या २६ वर्षीय तरुणाला अखेर मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.  जवळपास तीन राज्यांचे पोलीस आणि राज्यातील २० पेक्षा जास्त पोलीस स्टेशनची पोलीस या मिस्टर नटवरलालचा शोध घेत होते. निखिलची आई नगरसेविका असून वडील केंद्र शासनात मोठे अधिकारी आहेत. गेल्या वर्षभरापासून अनेकांना चुना लावून अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारा निखिल सुमन याला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. निखिलच्या अटकेमुळे जवळपास तीन राज्यांचे पोलीस आणि राज्यातील २० पेक्षा जास्त पोलीस स्टेशनमधील पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडलाय. कारण, बघताच क्षणी छु-मंतर म्हणत निखिल अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालत मोकाट फिरत होता. पण शेवटी मुंबई पोलिसांच्या जाळ्यात निखिल अडकला. अगदी सफाईदार इंग्रजी बोलून समोरच्यावर भुरळ पाडणारा निखिल उच्चशिक्षित असून त्याने हॉटेल मॅनेजमेंट केलंय. मात्र, त्याने त्याची ही हुशारी लोकांची फसवणूक करण्यासाठी वापरली. असं फसवायचा दुकानदारांना! कोणतीही मोठी परीक्षा देण्यासाठी किंवा उच्च शिक्षकासाठी जसा अभ्यास करावा लागतो त्या प्रमाणे निखिलने लोकांच्या फसवणुकीचा अभ्यास केला होता. ज्या दुकानदाराला फसवायचे आहे. त्या दुकानदाराच्या खात्याची संपूर्ण माहिती तो एक्सिस बॅंकेच्या मोबाईल बॅंकिंग अॅपमध्ये भरायचा आणि NEFT मधून द्वारे पैसे पाठवताना शेड्युलपेमेंट पर्याय निवडून दुकानदाराचे अकाऊंट शेड्युल बेनिफिशरी म्हणून अॅड करायचा दुकानदाराचे अकाऊंट शेड्युल पेमेंटमध्ये बेनिफिशरी म्हणून एड झाल्याचा Successful असा मॅसेज मोबाईल स्क्रीनवर यायचा तो मॅसेज निखिल दुकानदाराला पैसे पाठवले म्हणून दाखवायचा आणि इथेच दुकानदार फसायचे. तो खोटा स्क्रिन शॉट दुकानदारास दाखवायचा आणि दिलेला मोबाईल नंबर निखिल हा लगेच बंद करुन टाकायचा, अशी माहिती मुंबई पोलिसाचे प्रवक्ते प्रणय अशोक यांनी दिली. पैसे न मिळाल्याने दुकानदार निखिलने दिलेल्या मोबाईल नंबरवर फोन लावायचे पण “आपण डायल केलेला नंबर अस्तित्वात नाही” अशी सुचना दुकानदाराला ऐकू यायची. मुंबईतील मानखुर्द पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका ज्वेलसर्च्या दुकानातून आरोपी निखिल याने 5 लाख 33 हजार रुपयांच्या 7 सोन्याच्या साखळ्या घेऊन पोबारा केला होता. या प्रकरणी मालमत्ता कक्ष पोलिसांनी तांत्रिक तपास करीत सापळा रचून निखिलला अटक केली. आरोपी निखिलने आतापर्यंत ठाणे, मीरा रोड, वसई, विरार , पालघर, पुणे आणि ३ राज्यात अशा  प्रकारचे गुन्हे केल्याचे तपासात समोर आलंय. ६ वेगवेगळ्या भाषा येणाऱ्या निखिलची आई नगरसेविका आहे. तर वडील केंद्र शासनात अधिकारी पदावर कार्यरत आहेत. मात्र, निखिलच्या या अशा कर्तृत्वान कामगिरीमुळे त्यांनी निखिलशी सर्व संबंध तोडले आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Crime, Mumbai police, Thane

पुढील बातम्या