• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • 14 महिन्याच्या लेकीवर बापाने घरीच उपचार केले अन् तिने जीव सोडला, नाशकातील घटना

14 महिन्याच्या लेकीवर बापाने घरीच उपचार केले अन् तिने जीव सोडला, नाशकातील घटना


 रियाला न्यूमोनिया झाला होता. त्यामुळे तिला आडगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. पण...

रियाला न्यूमोनिया झाला होता. त्यामुळे तिला आडगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. पण...

रियाला न्यूमोनिया झाला होता. त्यामुळे तिला आडगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. पण...

  • Share this:
नाशिक, 25 ऑक्टोबर : 14 महिन्याच्या आजारी मुलीवर ( 14-month-old girl) जन्मदात्या पित्याने (father) घरीच उपचार केल्याने तिचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना नाशिकमध्ये (nashik) घडली आहे. मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पित्याविरोधात मयत मुलीच्या आईनेच पोलिसांत तक्रार दिली असून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकच्या पंचवटी परिसरात ही घटना घडली आहे. हेमंत भारत शेटे असं या घटनेतील संशयित पित्याचे नाव आहे. या प्रकरणी संशयित आरोपीची पत्नी अलका शेटे यांनी फिर्याद दिली आहे. शेटे दाम्पत्यास एक मुलगा आणि एक मुलगी अशी अपत्ये आहेत. त्यातील रिया ही 14 महिन्यांची बालिका काही दिवसांपासून आजारी होती. समीर वानखेडेंविरोधात गुन्हा दाखल होणार? वळसे पाटलांचं सूचक विधान, म्हणाले.... रियाला न्यूमोनिया झाला होता. त्यामुळे तिला आडगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. या उपचारांसाठी तिला किमान सहा दिवस हॉस्पिटलमध्ये दाखल करणे आवश्यक होते. मात्र, अवघ्या दोन दिवसांनंतरच संशयित हेमंतने रियाला डिस्चार्ज देण्याची मागणी डॉक्टरांकडे केली. ही बाब धोकादायक असून, तुम्ही तुमच्या जबाबदारीवर तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा, असं हॉस्पिटलने स्पष्ट केलं. त्यानेही तशी ग्वाही दिली. मात्र, तो तिला घेऊन थेट घरी पोहचला. तिथे त्याने तिच्यावर उपचार केले. मात्र, परिस्थिती हाताबाहेर गेली आणि 21 ऑक्टोबर रोजी रियाचा मृत्यू झाला. हेमंत हा वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत आहे. त्यामुळे त्याला थोडीफार माहिती आहे. त्याने काही वर्षांपूर्वी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम केले आहे. यानंतर तो एका फार्मा कंपनीत कामाला होता. तेथून पुढे तो सिल्वासा येथील एका कंपनीत पोहचला. रिक्षा चालकाला भरावे लागणार 3 कोटी रुपये, INCOME TAX ने पाठवली नोटीस सलाइन लावणे तसंच थोड्याफार औषधांची त्याला माहिती होती. या अल्पज्ञानाच्या जोरावर त्याने रियाला घरी बरे करण्याचा निर्णय घेतला होता. वास्तविक तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार होणे आवश्यक होते. या प्रकरणी हेमंतच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याच्याविरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रियावर घरी उपचार करण्यास फिर्यादीसह हेमंतच्या आईचाही विरोध होता. अखेर पोलिसांनी  मयत मुलीची आई अलका शेटे यांच्या तक्रारीवरून हेमंतच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
Published by:sachin Salve
First published: