मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /नितीन गडकरींच्या नावाचा वापर करून अनेकांना गंडा, भामट्या बापलेकाला बंगळुरूतून अटक

नितीन गडकरींच्या नावाचा वापर करून अनेकांना गंडा, भामट्या बापलेकाला बंगळुरूतून अटक

आयकर विभागात जे सोनं जप्त केलं जातं ते मी माझ्या ओळखीवर तुम्हाला मिळवून देतो सांगत त्यांना पळसमकर यांच्याकडून पाच लाख रुपये घेतले होते.

आयकर विभागात जे सोनं जप्त केलं जातं ते मी माझ्या ओळखीवर तुम्हाला मिळवून देतो सांगत त्यांना पळसमकर यांच्याकडून पाच लाख रुपये घेतले होते.

आयकर विभागात जे सोनं जप्त केलं जातं ते मी माझ्या ओळखीवर तुम्हाला मिळवून देतो सांगत त्यांना पळसमकर यांच्याकडून पाच लाख रुपये घेतले होते.

डोंबिवली, 10 जून : नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या नावाचा वापर करून अनेकांना गंडा घालणाऱ्या डोंबिवलीतील बाप लेकांना पोलिसांनी अटक केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपले भाऊ असल्याचं सांगून लोकांकडून पैसे उकळण्याचं काम हे भामटे करत होते. राजन आणि आनंद गडकरी असं या दोघांचं नाव आहे. अमोल पळसमकर यांच्याकडून त्यांनी पाच लाख रुपये उकळले होते. बंगळुरू इथं लपून बसलेले असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. (Cheating on name of Nitin Gadkari)

(वाचा-BMC निवडणुकीत मुंबईकर शिवसेनेला धडा शिकवतील - चंद्रकांत पाटील)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजन आणि त्यांचा मुलगा आनंद गडकरी या दोघांनी पळसमकर यांना सांगितलं होतं की, त्यांचं रेल्वे स्टेशन परिसरात सोन्याचं दुकान आहे. नितीन गडकरी हे आपले भाऊ असल्याचंही ते सांगायचे. आयकर विभागात जे सोनं जप्त केलं जातं ते मी माझ्या ओळखीवर तुम्हाला मिळवून देतो सांगत त्यांना पळसमकर यांच्याकडून पाच लाख रुपये घेतले होते. पळसमकर यांनी फ्रेबुवारी महिन्यात त्यांना पाच लाखांचा चेक दिला. त्यावर एक दोन महिन्यात सोनं मिळेल असं त्यांनी पळसमकर यांना सांगितलं. लोकमतनं हे वृत्त दिलं आहे.

(वाचा-Corona Update : रायगडमध्ये दिवसभरात तब्बल 61 मृत्यू, चिंता अजूनही कमी होईना)

पळसमकर यांना दोन महिन्यांनंतरही सोनं मिळालं नाही तर त्यांनी राजन आणि त्यांचा मुलगा आनंद यांच्याकडे तगादा लावला. त्यानंतर पैसे परत मागितले. पण त्यांनी पैसे द्यायला टाळाटाळ सुरू केली. आज उद्या करत ते टाळत होते. त्यानंतर पळसकर यांना फसवणुकीची शंका आल्यानं ते पोलिसांकडं गेले. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. मोबाईलच्या लोकेशनचा आधार घेत त्यांचा शोध लावला आणि बंगळुरूतून त्यांना अटक केली.

दरम्यान राजन गडकरींची सून आणि आनंदच्या पत्नीनंही पोलिसांत तक्रार दिली होती. सासू, सासरे आणि पती मुलगा ऋग्वेदला घेऊन बेपत्ता असल्याचं गीतांजली यांनी तक्रारीत म्हटलं होतं. त्यानुसार राजन गडकरी नातू ऋग्वेदलाही सोबत बंगळुरूला घेऊन गेले होते असं समोर आलं आहे. पोलिसांनी ऋग्वेदला आई गीतांजलीकडं सोपवलं आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींना 14 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

First published: