नराधम बापाचा पोटच्या मुलीवर बलात्कार, पीडिता 6 महिन्यांची गरोदर

नराधम बापाचा पोटच्या मुलीवर बलात्कार, पीडिता 6 महिन्यांची गरोदर

आई, भाऊ व बहीण घराबाहेर गेल्यावर नराधम पिताच करत होता लैंगिक अत्याचार

  • Share this:

रवी शिंदे,(प्रतिनिधी)

भिवंडी,8 डिसेंबर: नराधम बापाने पोटच्या सोळा वर्षीय मुलीवर अमानुष अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. पीडित मुलगी सहा महिन्यांची गरोदर असल्याची संतापजनक घटना किडवाईनगर, नागांव येथे समोर आली आहे. या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेप्रकरणी शनिवारी शांतीनगर पोलीस ठाण्यात नराधम बापाविरुद्ध गुन्हा दाखल होताच नराधम बापाच्या मुसक्या पोलिसांनी आवळून त्याला पोलीस कोठडीत डांबले आहे.

महंमद कासीम अंसारी (वय-45, रा. किडवाई नगर ) असे 16 वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाचे नाव आहे. पीडित मुलगी ही एकटीच घरात असताना वासनांधीन नराधम पिता महंमद याने मुलीवर वेळोवेळी बळजबरीने अत्याचार केला. दरम्यानच्या काळात मुलगी उत्तर प्रदेश येथे नातेवाईकांकडे लग्न कार्यक्रमासाठी गेली होती. त्यावेळी पीडित मुलीच्या मामीने तिची चौकशी केली असता सदरचा घृणास्पद प्रकार समोर आला. पीडितेकडे अधिक चौकशी केली असता आई व भाऊ, बहीण घराबाहेर गेल्यावर नराधम पिताच तिला धमकावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याचे तिने सांगितले.

या अमानूष घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसल्याने अखेर नातेवाईकांनी पीडितेला धीर देऊन शांतीनगर पोलीस ठाण्यात नराधम बापाविरोधात मुलीच्या जबाबावरून भादंवि कलम 376 सह लैंगिक अपराधापासून बालसंरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,8,9 (ह) 10 प्रमाणे गुन्हा दाखल करून एपीआय दुर्गेश दुबे यांनी नराधम अत्याचारी महंमद अंसारी यांस तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याला रविवारी भिवंडी कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्यास 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

First published: December 8, 2019, 5:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading