मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

जन्मदाता बापच निघाला नराधम, 9 वर्षाच्या लेकीवर लॉकडाऊनमध्ये रोज केला बलात्कार

जन्मदाता बापच निघाला नराधम, 9 वर्षाच्या लेकीवर लॉकडाऊनमध्ये रोज केला बलात्कार

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बापने पत्नी कामावर गेली असताना मुलीवर अत्याचार केले.

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बापने पत्नी कामावर गेली असताना मुलीवर अत्याचार केले.

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बापने पत्नी कामावर गेली असताना मुलीवर अत्याचार केले.

  • Published by:  Renuka Dhaybar
मिरा भाईंदर, 29 ऑगस्ट : लॉकडाऊनमध्ये गुन्ह्यांचे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. अशात मुंबईत बलात्काराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका वडिलांनीच आपल्या 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला आहे. भाईंदरमधील उत्तन इथेच हा भयंकर प्रकार घडला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. एका 35 वर्षीय नराधम बापानेच आपल्या पोटच्या 9 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली असून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बापने पत्नी कामावर गेली असताना मुलीवर अत्याचार केले. खरंतर, कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि घरी राहण्याची वेळ आली. यावेळी आरोपी पती घरीच असायचा तर पत्नीला कामाला जायची. याच संधीचा फायदा घेत आरोपी पिता रोज मुलीचे लैंगिक शोषण करायचा. पण भीतीपोटी मुलीने कोणाला काही सांगितलं नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. पण गेल्या आठवड्यात पीडित मुलगी शेजाऱ्यांकडे गेली असता त्यांनी तू शांत का आहेस असा प्रश्न विचारला असता पीडितेने रडत रडत संपूर्ण प्रकार सांगितला. सॅनिटाइझ करून उन्हामध्ये वाळवल्यामुळे 2000 च्या 17 कोटी नोटा झाल्या खराब 'मुंबईची लोकल सुरू करा, अन्यथा...' डबेबाल्यांनी सरकारकडे मोठी मागणी शेजाऱ्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि आरोपी बापाविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीविरोधात पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला असून गुरुवारी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात आरोपीला हजर केले असता न्यायालयाने ३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
First published:

Tags: Mumbai, Mumbai police

पुढील बातम्या