आजाराला कंटाळून वडिलांनी केली दोन मुलांची हत्या, GPSमुळे झाला खुलासा

आजाराला कंटाळून वडिलांनी केली दोन मुलांची हत्या, GPSमुळे झाला खुलासा

नंतर ते गाडी घेऊन खडाळा गावाजवळ गेले. तेव्हा रात्री साडेबारा वाजले होते. तोपर्यंत दोनही मुलं झोपली होती. त्यांनी त्याच अवस्थेत मुलांची गळा दाबून हत्या केली.

  • Share this:

मुंबई 10 ऑक्टोंबर : दुर्धर आजार, बायकोसोबत होणारं सततचं भांडण आणि मुलांच्या भविष्याची चिंता यामुळे एका जन्मदात्याने आपल्या दोन मुलांची हत्या केली आणि स्वत: आत्महत्या करण्यासाठी कार घेऊन निघाला असताना GPS मुळे पोलिसांना त्याच्या गाडीला अडवता आलं आणि ही धक्कादाय गोष्ट बाहेर आली. पोलिसांनी या निर्दयी बापाला अटक केलीय. चंद्रकांत अशोक मोहिते असं आरोपीचं नावं आहे. कारच्या डिक्कीत मुलांचे मृतदेह ठेवून तो मुंबईच्या खाडीत उडी मारून आत्महत्या करणार होता. तसा फोन त्याने त्याच्या भावालाही केला होता. भावाने मुंबई पोलिसांना कळवलं होतं. मात्र मुंबई पोलिसांनी गाडीचा क्रमांक चुकीचा लिहिल्याने टोल नाक्यावरून तो निसटला आणि नंतर काही वेळाने त्याला पकडता आलं मात्र तोपर्यंत दोन मुलांचा जीव गेला होता.

अमित शहांनी 370 वरून पवारांना पुन्हा घेरलं; म्हणाले, मतदारच जाब विचारतील

'दैनिक लोकमत'नं याबाबतचं वृत्त दिलंय. चंद्रकांत मोहिते यांना टीबी झाला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती खंगत चालली होती. गौरव आणि गौरवी अशी दोन मुलं त्यांना होती. आजारपणामुळे त्यांची मानसिक स्थितीही चांगली नव्हती. आपल्या मृत्यूनंतर मुलांचं काय होईल अशी त्यांना सतत चिंता असायची. त्यातूनच त्यांचे बायकोसोबत खटकेही उडत होते. घटनेच्या दिवशी चद्रकांत यांचा भाऊ मुंबईत आला होता. त्याला रेल्वे स्टेशनला सोडायला जातो असं सांगून ते आपल्या कारने दोन मुलांना घेऊन निघाले. भावाला रेल्वे स्टेशनला सोडून त्यांनी त्यांच्या मनात ठरलेली योजना अंमलात आणण्यासाठी निघाले.

अजित दादांना विजयी करण्यासाठी सर्व कुटुंबच उतरलं प्रचारात!

वेळ होत असल्याने त्यांच्या पत्नीने त्यांना फोन केला तेव्हा थोड्या वेळातच येतो असंही त्यांनी सांगितलं. मात्र त्यानंतर त्याने भावाला फोन करून दोन मुलांना ठार करून आत्महत्या करत असल्याचं सांगितलं. नंतर ते गाडी घेऊन खडाळा गावाजवळ गेले. तेव्हा रात्री साडेबारा वाजले होते. तोपर्यंत दोनही मुलं झोपली होती. त्यांनी त्याच अवस्थेत मुलांची गळा दाबून हत्या केली आणि मृतदेह गाडीच्या डिक्कीत टाकला.

आणि ते मुंबईच्या दिशेने निघाले होते. तोपर्यंत त्यांच्या भावाने मुंबई पोलिसांना कळवलं होतं. मात्र माहिती घेताना पोलिसांनी गाडी क्रमांक चुकीचा लहिला होता. त्यामुळे गाडी टोल नाक्यावरून सुटली होती. मात्र गाडीला GPS असल्याने नंतर खेड शिवापूर टोल नाक्याजवळ पोलिसांनी ही गाडी पकडली तेव्हा सर्व घटनेचा उलगडा झाला. या आधीच गाडी अडकवली गेली असती तर दोन चिमुकल्यांचा जीव वाचला असता अशी शक्यता व्यक्त केली जातेय.

मुख्यमंत्री फडणवीस करतात रात्री 12 वाजता फोन, अमित शहांनी सांगितला किस्सा!

पोलिसांनी चंद्रकांतला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली असून पोलीस पुढचा तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 10, 2019 08:47 PM IST

ताज्या बातम्या