मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /वरळी सिलेंडर स्फोटात बाळाच्या मृत्यूनंतर वडिल आणि आईनेही सोडला जीव, मुंबई हळहळली

वरळी सिलेंडर स्फोटात बाळाच्या मृत्यूनंतर वडिल आणि आईनेही सोडला जीव, मुंबई हळहळली


बीडीडी चाळीतील एका खोलीमध्ये 30 नोव्हेंबर गॅस सिलेंडरचा स्फोट झाला होता. यामध्ये चार महिने वय असलेल्या एका बाळासह चौघे जण भाजले होते.

बीडीडी चाळीतील एका खोलीमध्ये 30 नोव्हेंबर गॅस सिलेंडरचा स्फोट झाला होता. यामध्ये चार महिने वय असलेल्या एका बाळासह चौघे जण भाजले होते.

बीडीडी चाळीतील एका खोलीमध्ये 30 नोव्हेंबर गॅस सिलेंडरचा स्फोट झाला होता. यामध्ये चार महिने वय असलेल्या एका बाळासह चौघे जण भाजले होते.

  मुंबई, 06 डिसेंबर :  मुंबईतील वरळी परिसरातील कामगार वसाहतीमध्ये (Worli labor colony) एका घरात गॅस सिलेंडरचा (Cylinder blast) स्फोट होवून 4 जण भाजले होते. जखमींवर मुंबई सेंट्रल स्थित नायर रुग्णालयामध्ये (Mumbai Nair Hospital) उपचारासाठी दाखल  केले असता 3 दिवसांपूर्वी लहान मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज त्याच्या आई-वडिसांनी सुद्धा अखेरचा श्वास घेतला.

  वरळीतील गणपतराव जाधव मार्गावर स्थित कामगार वसाहतीत बीडीडी चाळीतील एका खोलीमध्ये 30 नोव्हेंबर गॅस सिलेंडरचा स्फोट झाला होता. जखमींना तातडीने नायर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. सिलेंडर ब्लास्टमध्ये चार जण गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यातील दुर्घटनेत चिमुरड्याचा मृत्यू अवघ्या 1 दिवसात झाला. त्यानंतर बाळाचे वडील आनंद पुरी यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता आनंद पुरी यांच्या पत्नी विद्या आनंद पुरी यांचा देखील मृत्यू झाला. गेल्या सहा दिवसांपासून त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू होते.

  ऐन हिवाळ्यात पावसाच्या सरी, IMD कडून Alert, वाचा मुंबई-पुण्यात काय स्थिती

  तर या स्फोटामध्ये जखमी पाच वर्षीय मुलाची प्रकृत्ती सध्या स्थिर आहे. नायर हॅास्पिटल डॅाक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तीन जणांचा हकनाक बळी गेला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

  काय आहे प्रकरण?

  बीडीडी चाळीतील एका खोलीमध्ये 30 नोव्हेंबर गॅस सिलेंडरचा स्फोट झाला होता. यामध्ये चार महिने वय असलेल्या एका बाळासह 5 वर्षे वयाचा मुलगा, एक महिला (वय वय 25) आणि एक पुरुष (वय 27) असे चौघे जण भाजले होते. संबंधित घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी महानगरपालिकेचं अग्नीशमन दल, विभाग कार्यालयातील यंत्रणा तसंच पोलीस यांनी मदतकार्य करुन चारही रुग्णांना नायर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण नायर रुग्णालयात या जखमींच्या उपचारामध्ये दिंरगाई करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. या संबंधिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओतील डॉक्टर आणि पारिचारीकांची असंवेदनशीलता पाहून काळीज पिळवटून जाईल.

  आज ममता बॅनर्जी घेणार शरद पवारांची भेट; भेटीबाबत मलिकांनी दिली महत्त्वाची माहिती

  संबंधित घटनेबाबत जो व्हिडीओ व्हायरल झाला होता त्यामध्ये डॉक्टर, नर्सेस दिसत आहेत. व्हिडीओ बनवणारा व्यक्ती रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप करत आहेत. व्हिडीओत एक व्यक्ती भाजलेला आहे. तो वेदनांनी प्रचंड विव्हळताना दिसतोय. त्याचबरोबर एक चार महिन्यांचं बाळ खूप जिवांच्या आकांताने रडतंय. या बाळाला देखील भाजलेलं दिसतंय. पण डॉक्टर, नर्सेस कुणीही त्यांच्याकडे लक्ष देत नाहीय. हा सगळा थरार कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाला होता. व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीने रुग्णांना तासाभरापासून तसंच ताटकळत ठेवलं असल्याचा आरोप केला आहे. या व्हिडीओमुळे खळबळ उडाली होती. पालिकेनं या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे.

  First published: