#WomensDay : अॅसिड हल्ल्यात चटका सोसणाऱ्या 'ती'चा फॅशन शो!

#WomensDay : अॅसिड हल्ल्यात चटका सोसणाऱ्या 'ती'चा फॅशन शो!

ठाण्यात अॅसिड हल्ला सहन करणाऱ्या आणि त्याच्या वेदना भोगणाऱ्या त्या महिलांसाठी आणि त्या महिलांसोबत एका आगळावेगळआ फॅशन शो आयोजित करण्यात आला.

  • Share this:

08 मार्च : आज जागतिक महिला दिन आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ठाण्यात एक आगळावेगळा फॅशन शो करण्यात आला. अॅसिड हल्ला सहन करणाऱ्या आणि त्याच्या वेदना भोगणाऱ्या त्या महिलांसाठी आणि त्या महिलांसोबत एका आगळावेगळआ फॅशन शो आयोजित करण्यात आला.

अॅसिड हल्ला आणि त्यानंतर उद्भवणारी परिस्थिती आपल्या कल्पनेबाहरची असते. शारीरीक, मानसिक पिडेसोबतच सामाजिक पिडाही या महिलांना सहन कराव्या लागतात. त्यातून एकंदरीतच त्यांचा प्रवास कसा असतो. यावर प्रकाश टाकणारा हा फॅशन शो होता.

अॅसिड हल्ल्यानंतर या महिलांचे आयुष्य कसे असते? अॅसिड हल्ल्यांना बळी पडलेल्या महिलांबाबत त्यांचा मित्रपरिवार आणि कुटुंबियांचे वागणे कसे असते? अॅसिड हल्ल्यातील पीडितांना नोकऱ्या मिळतात का? त्या आपले जीवन कसे जगतात?

अशाप्रकारच्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे या कार्यक्रमाद्वारे मिळाली आहेत. अॅसिड हल्ल्यातील तब्बल 11 पिडीत महिला या फॅशन शो मध्ये सहभागी झाल्या होत्या. समाजानं स्विकारण्याबरोबरच दोषींना कडक शिक्षा करावी अशी मागणीही यावेळी पीडित महिलांकडून करण्यात आली.

पण आयुष्याकडे पुन्हा सकारात्मकतेने आणि जिद्दीने पाहणाऱ्या या महिलांना न्यूज 18 लोकमतचा सलाम!

First published: March 8, 2018, 8:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading