PHOTOS : हक्काच्या तुकड्यासाठी शेतकरी आला मुंबापुरीत !

उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव मिळावा, पिढ्यानपिढ्या वनजमिनी कसत असलेल्या शेतकऱ्यांना वनाधिकार कायद्यातील तरतुदीप्रमाणे त्वरित त्या जमिनीचे मालक बनवण्यात यावे अशी प्रमुख मागणी मोर्चेकऱ्यांची आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 22, 2018 10:29 AM IST

PHOTOS : हक्काच्या तुकड्यासाठी शेतकरी आला मुंबापुरीत !

 शेतकरी, शेतमजूर, आदिवासींच्या न्यायहक्कासाठी लोक संघर्ष मोर्चाच्या वतीनं ठाणे ते विधानभवनापर्यंत मोर्चा मुंबईत धडकला आहे. हजारो कष्टकऱ्यांचा हा मोर्चा आझाद मैदानावर दाखल होईल.

 मुंबईकरांची आणि खासकरून शाळकरी मुलं, चाकरमान्यांची कोणतीही गैरसोय होवू नये म्हणून हा मार्चा रात्रीच विधानभवनाकडे निघाला. त्यामुळे ऐनसकाळी ईस्टनएक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी टळली.

  आझाद मैदानावर मोर्चा पोहोचल्यानंतर सभा होणार आहे. या सभेचे अध्यक्ष ज्येष्ठ न्यायाधीश बी.जे कोळसे पाटील असतील. यानंतर मुंबई विधानभवनावर मोर्चा धडकणार आहे.

Loading...

 हजारो शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत भर उन्हातान्हात पायपीट करत आपल्या न्याय हक्कासाठी निघाले. लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आलाय.

 मराठवाडा, विदर्भ, खान्देश, सांगली, साताऱ्यासह, ठाणे, पालघर जिल्ह्यातील शेतकरी या मोर्चात सहभागी झाले आहेत.

काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या? - उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव मिळावा, पिढ्यानपिढ्या वनजमिनी कसत असलेल्या शेतकऱ्यांना वनाधिकार कायद्यातील तरतुदीप्रमाणे त्वरित त्या जमिनीचे मालक बनवण्यात यावे आणि वनपट्टे धारकांना आणि ज्यांचे वन दावे प्रलंबित आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना दुष्काळाची मदत आणि पिक कर्ज मिळावे अशी प्रमुख मागणी आहे.

संकटमोचक अशी ओळख असणारे भाजप नेते गिरीश महाजनांनी या मोर्चामध्येही मध्यस्थाची भूमिका घेतली आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मोर्चेकऱ्यांची भेट घडवून देण्याचं आश्वासन महाजनांनी दिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 22, 2018 10:29 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...