• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • Farmers Protest : मोदी सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी, शरद पवारांचा सल्ला

Farmers Protest : मोदी सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी, शरद पवारांचा सल्ला

'घाईघाईने विधेयकाचा निर्णय घेण्यात आला होता. आता त्याचे परिणाम मोदी सरकारला भोगावे लागणार आहे'

 • Share this:
  मुंबई, 06 डिसेंबर : कृषी कायद्याच्या (farm act-2020) विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलन दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत चालले आहे. आता हे आंदोलन फक्त दिल्लीपुरते मर्यादित राहणार नाही. देशभरातील शेतकरी यात सहभागी होतील आणि आपल्या पद्धतीने प्रश्न सोडवतील. त्यामुळे सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सल्ला दिली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निवासस्थानी जाऊन तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत असताना कृषी विधेयकाविरोधातील आंदोलनावरून मोदी सरकारला सल्लावजा टोला लगावला. पत्नीने पाहिली क्राइम पेट्रोल मालिका,पतीच्या हत्येचा कट ऐकून पोलीसही झाले हैराण 'पंजाब आणि हरियाणाचा शेतकरी हा रस्त्यावर उतरला आहे. याचे गांभीर्य सरकारने घेतले पाहिजे. पण दुर्दैवाने या आंदोलनाची अशी दखल घेतली नसल्याचे दिसून आले आहे. जर असंच राहिले तर हे आंदोलन फक्त दिल्लीपुरते मर्यादित राहणार नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकं शेतकऱ्याच्या आंदोलनात पाठिशी उभे राहतील आणि प्रश्नाची सोडवणूक आपल्या पद्धतीने करतील. त्यामुळे मोदी सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी, असा सल्ला शरद पवारांनी दिला. तसंच, 'ज्या वेळी हे विधेयक मांडण्यात आले होते. मी त्यावेळीही कुणाचे न ऐकता निर्णय घेण्यात आला. त्यावेळी लोकसभेत विधेयकावर चर्चा करण्यात आली नाही. घाईघाईने विधेयकाचा निर्णय घेण्यात आला होता. आता त्याचे परिणाम मोदी सरकारला भोगावे लागणार आहे' असा इशाराही पवारांनी दिली. वर्गातच अल्पवयीन मुला-मुलीचं लग्न; मंगळसुत्र, सिंदुर भरतानाचा VIDEO VIRAL केंद्राच्या तीन नवीन कृषी कायद्याविरोधात पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या भागांमध्ये हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. कुठे लाठीचार्ज, तर अश्रूधुराचा वापर इतकच नाही तर कधी पाण्याचा वापर केला मात्र शेतकरी आपल्या मागण्या आणि भूमिकेवर ठाम राहिल्यानं आता केंद्र सरकार काय भूमिका घेणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
  Published by:sachin Salve
  First published: