S M L

आतापर्यंत 10 लाख 11 हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले -देशमुख

१६ ऑगस्ट २०१७ पर्यंत १२ लाख ३८ हजार शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून १० लाख ११ हजार शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

Sachin Salve | Updated On: Aug 16, 2017 07:02 PM IST

आतापर्यंत 10 लाख 11 हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले -देशमुख

रफीक मुल्ला, मुंबई

16 आॅगस्ट : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीचे ऑनलाईन भरण्याची प्रकिया  २४ जुलै २०१७ पासून सुरू झाली आहे. १६ ऑगस्ट २०१७ पर्यंत १२ लाख ३८ हजार  शेतकऱ्यांची  नोंदणी झाली असून १० लाख ११ हजार शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज  प्राप्त झाले आहेत, अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

देशमुख म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना  2017 च्या कर्जमाफीसाठी राज्यामध्ये एकूण  26 हजार केंद्रावर अर्ज भरण्यात येत असून त्यात आपले सरकार केंद्र, नागरीक सुविधा केंद्र, संग्राम केंद्र आणि काही ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था या केंद्राचा समावेश आहे.

सदरचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सर्व शेतकऱ्यांचे अर्ज ऑनलाईन भरून होईपर्यत ही केंद्र सुरू राहणार आहेत. मागच्या आठवड्यापासून जवळपास रोज एक ते सव्वालाख शेतकऱ्यांची नोंदणी होत आहे. असंही देशमुख यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 16, 2017 07:02 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close