या आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या आणि सरकारची भूमिका

या आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या आणि सरकारची भूमिका

शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत आणि त्याला सरकारनं काय म्हटलंय ते पहा

  • Share this:

12 मार्च : आपल्या हक्कांसाठी 200 किलोमीटरची पायपीट करणाऱ्या बळीराजाच्या लढ्याला 90 टक्के यश आलंय. कारण शेतकऱ्यांच्या 90 टक्के मागण्या सरकारनं मान्य केल्या असून, त्यांच्या पूर्ततेसाठी लिखित आश्वासनही देण्यात आलंय.

शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत आणि त्याला सरकारनं काय म्हटलंय ते पहा

शेतकऱ्यांची मागणी - कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावे करा

सरकारची भूमिका - वनहक्क जमिनीचे दावे 6 महिन्यांत निकाली काढू

अपात्र प्रकरण पुन्हा तपासू

Loading...

मुख्य सचिव आढावा घेणार

--------------------------

शेतकऱ्यांची मागणी - बोंडअळी, गारपीटग्रस्तांना एकरी 40 हजारांची भरपाई

सरकारची भूमिका - पीक पाहणी अहवाल पाहून निर्णय घेऊ

--------------------------

शेतकऱ्यांची मागणी - शेतमालाला दीडपड हमीभाव द्यावा

सरकारची भूमिका - दीडपट हमीभावाचा निर्णय घेतला आहे.

हमीभाव केंद्राचा विषय आहे

60% खरेदी केंद्रानं करावी

50% खरेदीची हमी आम्ही घेऊ

------------------------

शेतकऱ्यांची मागणी - विनाअट संपूर्ण कर्जमाफी द्या

सरकारची भूमिका - कर्जमाफीचा 80% शेतकऱ्यांना लाभ मिळाला

उरलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकार काहीतरी नक्कीच करेल

सरसकट कर्जमाफीसाठी परिस्थिती नाही

शेतकरी कुटुंबातील पती-पत्नी दोघांना मिळून दीड लाख देण्याबाबत नवीन जीआर काढू

--------------------

शेतकऱ्यांची मागणी - जीर्ण रेशन कार्ड बदलून द्यावे

सरकारची भूमिका - 6 महिन्यांत नवीन रेशन कार्ड देऊ

आदिवासी भागात 3 महिन्यांत रेशन कार्ड देऊ

------------------------------

शेतकऱ्यांची मागणी - संजय गांधी, श्रावणबाळ योजनेची योग्य अंमलबजावणी

सरकारची भूमिका - सिव्हिल सर्जन महिन्यात एक वेळ प्रमाणपत्र देईल तो ग्राह्य धरता येईल

प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकाऱ्याचे अधिकार वाढवणार

संजय गांधी, श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थीच्या मानधनासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

--------------------

शेतकऱ्यांची मागणी - वीजबिल माफ करा

सरकारची भूमिका- माहिती प्रतिक्षेत

-------------------------

शेतकऱ्यांची मागणी -​ दुधाला 40 रुपये/लिटर भाव द्या

सरकारची भूमिका - माहिती प्रतिक्षेत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 12, 2018 06:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...