ठाकरे सरकारची वचनपूर्ती: कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

ठाकरे सरकारची वचनपूर्ती: कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

आमचं सरकार केवळ घोषणा करणारं नाही तर योजनांची अंमलबजावणी करणार असल्याचं सांगत कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी सोमवारी जाहीर करण्यात आली.

  • Share this:

मुंबई,24 फेब्रुवारी:विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे सरकारने आपली वचनपूर्ती केली आहे. आमचं सरकार केवळ घोषणा करणारं नाही तर योजनांची अंमलबजावणी करणार असल्याचं सांगत कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी सोमवारी जाहीर करण्यात आली.

कर्जमाफी झालेल्या पहिल्या यादीत राज्यातील 68 गावातील शेतकऱ्यांची नावे आहेत. सुमारे 9 हजार शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, कृषिमंत्री दादा भुसे उपस्थित होते. ज्या शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला होता. त्या दोन हजार शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पैसे वळते करण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्ह्याची यादी पालकमंत्री यांना सुपूर्द करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. एप्रिल अखेरपर्यंत या योजनांची अमलबजावणी होण्याची शक्यता आहे. 15 हजार 358 शेतकऱ्यांची नाव पहिल्या यादीत आहेत. लवकरच कर्जमाफीचा दुसरा टप्पा मुख्यमंत्री लवकरच जाहीर करणार आहेत.

तुमच्या पक्षाचा झेंडा नाही, राष्ट्रध्वज आहे; भाजप-राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये शाब्दिक चकमक

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शेतकरी कर्जमाफीसंदर्भात मोठी घोषणा केली होती. राज्यातील शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचे सरकारचे प्रयत्न असून, पहिली यादी 24 फेब्रुवारीला जाहीर होणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. अधिवेशनाला सुरूवात झाल्यानंतर काही तासात महाविकास आघाडी सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी प्रमाणपत्र मिळणार..

2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करणार असं वचन उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. तसेच गिरणी कामगारांच्या घरासाठी 1 मार्च रोजी लॉटरी निघणार आहे. 35 लाख शेतकर्‍यांच्या कर्जखात्यांची यादी तयार केली असून, टप्प्याटप्प्याने कर्ज-माफीची अंमलबजावणी करणार आहे. कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांना तसं प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

सोलापूरची स्नेहल अंबरकर बनली पहिली लोकोपायलट, 'राजधानी' चालवण्याचंही स्वप्न

विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालं. या अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार हे आपलं पहिलं बजेट सादर करणार आहेत. सरकारला तीन महिने झाले आता आम्ही त्यांना जाब विचारणार असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपच्या आमदारांनी आंदोलन केलं. सर्व आमदार विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसले आणि सरकार विरोधात घोषणाबाजी केली. कामकाजाला सुरुवात होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहाला मंत्र्यांचा परिचय करून दिला. तर अर्थमंत्री अजित पवार यांनी सुधारणा अध्यादेश मांडला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला तर भाजपच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.

भाजपला धक्का : जातीचा दाखला रद्द झाल्याने 9 महिन्यातच स्वामींची खासदारकी धोक्यात?

फडणवीस म्हणाले, सरकारने दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाहीये. केवळ 20 हजार जणांची यादी देणार आहे अशी फसवी घोषणा आहे. शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा प्रकार सुरु आहे. रोज महिलांवर अत्याचार सुरुच आहेत. त्या संदर्भात सरकारची संवेदनशीलता दिसत नाही. आम्ही हे विषय आज सभागृहात उपस्थित करणार आहोत. महाविकास आघाडी सरकारचे नेत्यांची सर्व आमदार यांची आज महत्त्वपूर्ण बैठक

दरम्यान महाविकास आघाडीचीही महत्त्वाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, अजित पवार यासह प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यात अधिवेशनाचं कामकाज आणि महाविकास आघाडी अजेंडा यावर चर्चा होणार आहे.

धनंजय मुंडे म्हणाले, अर्थसंकल्प मधून मोठा दिलासा मिळेल. भाजपने सत्तेत असताना शेतकरी फसवणूक केली. फडणवीस यांची कर्जमाफी भीक नको कुत्रा आवर अशीच राहिली होती. त्याचा पर्दाफाश करणार आहोत.

First published: February 24, 2020, 3:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading