धर्मा पाटील आत्महत्या: 'त्या' तीन जणांविरोधात FIR नोंदवण्याची शिफारस

धर्मा पाटील आत्महत्या: 'त्या' तीन जणांविरोधात FIR नोंदवण्याची शिफारस

धुळ्यातील शेतकरी धर्मा पाटील आत्महत्या संबंधित तीन जणांविरोधात एफआयआर नोंदवण्याची चौकशी समितीने शिफारस केली आहे.

  • Share this:

मुंबई, 28 ऑगस्ट: धुळ्यातील शेतकरी धर्मा पाटील आत्महत्या संबंधित तीन जणांविरोधात एफआयआर नोंदवण्याची चौकशी समितीने शिफारस केली आहे. या प्रकरणात स्थानिक जमीन अधिग्रहण अधिकारी प्रतिभा सपकाळे, तहसील अधिकारी रोहिदास खैरनार आणि मध्यस्थ दत्तात्रय देसले यांच्याकडून कामात अनियमितता झाल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे. या तिघांविरोधात एफआयआर दाखल करण्यात यावा, अशी चौकशी समितीनं शिफारस केली आहे.

भूसंपादनात फळबागाचा मोबदला न मिळाल्याने धुळे जिल्ह्यातील विखरण (ता. शिंदखेडा) येथील शेतकरी धर्मा पाटील यांनी जानेवारी 2018 मध्ये मंत्रालयात विष प्राशन केले होते. नंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. माजी जिल्हा न्यायाधीश श्याम दरणे यांच्या अध्यक्षतेखालील एक सदस्यीय चौकशी समितीने आपला अहवाल राज्य मानवी हक्क आयोगाला सादर केला आहे. मयत धर्मा पाटील आत्महत्या संबंधित तीन जणांविरोधात एफआयआर नोंदवण्याची चौकशी समितीची शिफारस करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यावेळी सखूबाई पाटील नजरकैदेत...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेनिमित्त 22 ऑगस्ट रोजी दोंडाईचा दौऱ्यावर आले होते. तत्पूर्वी धर्मा पाटील यांची पत्नी सखूबाई पाटील (वय-72) यांना त्यांच्या घरी पोलिसांनी नजरकैदेत ठेवले होते. मुख्यमंत्री दौऱ्यावर असताना सखूबाई आणि त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी काही हालचाल करू नये, म्हणून त्यांना राहत्या घरी पोलिनांनी स्थानबद्ध केले होते. त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी दोन महिला पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. या दरम्यान सखूबाई पाटील यांचा रक्तदाब वाढला होता. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. धर्मा पाटील यांनी आत्महत्या केल्यानंतरही न्याय न मिळाल्याने पाटील कुटुंबिय व्यथित आहे.

गणेश नाईकांनी शिवसेनेऐवजी भाजपला का दिली पसंती? पाहा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 28, 2019 10:05 AM IST

ताज्या बातम्या