मंत्रालयात 80 वर्ष वृद्ध शेतकऱ्याच्या आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालयात 80 वर्ष वृद्ध शेतकऱ्याच्या आत्महत्येचा प्रयत्न

काल हा शेतकरी मंत्रालयात आला होता. धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात या शेतकऱ्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली. इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्या बाबत धर्मा पाटील यांनी गेले तीन महिन्यापासून पाठपुरावा सुरू केला होता

  • Share this:

23 जानेवारी: महाराष्ट्रात कर्जमाफी, हमीभाव अशा अनेक  समस्या असतानाच आता एक नवीन घटना घडली आहे. न्याय मिळावा म्हणून मंत्रालयाचे उंबरठे जिझवणाऱ्या एका वृद्ध  शेतकऱ्याने  मंत्रालयासमोर आत्महत्या केली आहे.  धर्मा पाटील या 80 वर्षीय शेतकऱ्याने काल विष पिऊन मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

काल हा शेतकरी मंत्रालयात  आला होता.  धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात या शेतकऱ्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली. इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्या बाबत धर्मा पाटील यांनी गेले तीन महिन्यापासून पाठपुरावा सुरू केला होता.मात्र त्यांना लवकर भरपाई मिळू न शकल्याने   हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी तातडीने या शेतकऱ्याला जवळच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात शेतकऱ्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.

तर दुसरीकडे  पाटील यांचे नेमके प्रकरण काय आहे हे समजून घेत अधिकार्यांनी सारवासारव सुरु केली आहे. पाटील यांच्या मोबदला प्रकरणाचा निवडा आधीच झाला असल्याचे अधिकारी सांगत  आहेत. तरी पाटील यांच्या शेतातील फळझाडांचा मोबदला का त्यांना मिळाला नाही याचे उत्तर मात्र अधिकारी देण्यास असमर्थ ठरत आहेत.

शेतकऱ्यांचा प्रश्न इतका ऐरणीवर  आला आहे मराठवाड्यात शेतकऱ्यांनी आत्महत्येचा इशारा दिला आहे आता अशा परिस्थितीत तरी सरकार शेतकऱ्यांचा प्रश्न गांभीर्य़ाने घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 23, 2018 06:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...