कर्जमाफीची डेडलाईन हुकलीच !,आता 2 आॅक्टोबरपर्यंत गावा-गावात होणार चावडीवाचन

कर्जमाफीची डेडलाईन हुकलीच !,आता 2 आॅक्टोबरपर्यंत गावा-गावात होणार चावडीवाचन

आज मंत्रालयात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कर्जमाफीसाठी गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली.

  • Share this:

२६ सप्टेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐतिहासिक कर्जमाफीसाठी दिलेली 1 आॅक्टोबरची डेडलाईन हुकली आहे. आता 2 आॅक्टोबरपर्यंत राज्यातील सर्व गावात चावडीवाचन पूर्ण करण्यात येणार आहे. बँकांनी कर्जमाफीसाठी माहिती उपलब्ध करुन द्यावी आणि आधार संलग्न नसणाऱ्या शेतकऱ्यांनी  तत्काळ आधार कार्डशी संलग्न व्हावे असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलंय. मात्र, कर्जमाफीची नेमकी तारीख काय हे मात्र अजुनही गुलदस्त्याच आहे.

आज मंत्रालयात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कर्जमाफीसाठी गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली.

या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 22 सप्टेंबर 2017 होती. मुदतीअखेर एकूण 56 लाख 59 हजार ३९३ शेतकरी कुटुंबांचे अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये 2 लाख 41 हजार 628 शेतकऱ्यांनी आधार कार्डचा क्रमांक दिलेला नाही तसंच या अर्जांमध्ये 77.26 लाख खातेदारांचा समावेश आहे.  2 ऑक्टोबर 2017 पर्यंत गावात चावडीवाचन पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हास्तरिय यंत्रणेकडून याबाबतची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी बैठकीत दिली.

तसंच बँकांकडून संपूर्ण माहिती उपलब्ध झाल्यानंतर माहिती तंत्रज्ञान विभागाने तपासणी करावी. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर ज्या जिल्ह्यांतील सर्व बँकांची संपूर्ण माहिती उपलब्ध होईल त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात ही रक्कम जमा करण्याची प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यात येईल, अशी चर्चा यावेळी करण्यात आली.

आधार नंबर नमुद करण्याचं आवाहन

ज्या शेतकऱ्यांनी अर्जामध्ये आधार क्रमांक नमुद केला नाही त्यांना आधार/EID  क्रमांक ऑनलाईन नमुद करण्यासाठी अर्ज दुरूस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  शेतकऱ्यांनी आधार केंद्रांवर जाऊन आधार नोंदनी करून/EID  क्रमांक नमुद करून अर्ज आपले सरकार पोर्टवर दुरूस्त करावेत असे आवाहन ही या बैठकीत करण्यात आले आहे.

First published: September 26, 2017, 9:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading