S M L

गँगस्टर फरीद तनाशा हत्या प्रकरणी 6 जणांना जन्मठेप

तनाशा हा अंडरवर्ल्ड डाॅन छोटा राजनच्या जवळचा होता. ३ जून २०१० ला ही हत्या करण्यात आली होती. चेंबूरमधील एका रिअल इस्टेटच्या वादातून ही हत्या झाली होती.

Sachin Salve | Updated On: May 30, 2018 04:31 PM IST

गँगस्टर फरीद तनाशा हत्या प्रकरणी 6 जणांना जन्मठेप

मुंबई, 30 मे : कुख्यात अंडरवर्ल्ड गँगस्टर फरीद तनाशा हत्या प्रकरणातील ११ आरोपींना मुंबईतील मकोका कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. यातील ११ आरोपींपैकी ६ जणांना जन्मठेप तर ५ जणांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आला आहे.

तनाशा हा अंडरवर्ल्ड डाॅन छोटा राजनच्या जवळचा होता. ३ जून २०१० ला ही हत्या करण्यात आली होती. चेंबूरमधील एका रिअल इस्टेटच्या वादातून ही हत्या झाली होती. चेंबूरला दत्तात्रय भाकरे हा बिल्डर एका जागी इमारत बांधणार होता त्याला तिथल्या सोसायटीतील रहिवासीयांनी विरोध केला होता. तनाशानं सोसायटीवासियांची बाजू घेतली होती. त्यामुळे भाकरे यानं तनाशचा काटा काढायचा ठरवलं. त्यानं भरत नेपाळी आणि विजय शेट्टी यांना सुपारी दिली. जाफर खान, मोहम्मद खान, रवीप्रकाश सिंग, पंकज सिंग, रणधीर सिंग यांनी ही प्रत्यक्ष हत्या केली होती.

खरंतर ही हत्या दाऊद इब्राहिमनं केली आणि दाऊद विरुद्ध छोटा राजन या टोळीयुद्धातून ही हत्या झाली अशी चर्चा होती. पण अखेरपर्यंत हा मुद्दा सिद्ध झाला नाही. तनाशाची हत्या झाल्याचा बदला म्हणून दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरवर नागपाड्यात घराजवळ गोळीबार करण्यात आला अशी चर्चा होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 30, 2018 04:31 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close