मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली प्रसिद्ध युट्यूबर 'जीतू-जान'ला अटक

पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली प्रसिद्ध युट्यूबर 'जीतू-जान'ला अटक

जितेंद्रनेच आपली मुलगी कोमलची हत्या केली असा आरोप अग्रवाल कुटुंबीयांनी केला आहे.

जितेंद्रनेच आपली मुलगी कोमलची हत्या केली असा आरोप अग्रवाल कुटुंबीयांनी केला आहे.

जितेंद्रनेच आपली मुलगी कोमलची हत्या केली असा आरोप अग्रवाल कुटुंबीयांनी केला आहे.

  • Published by:  sachin Salve
मुंबई, 02 जून: युट्यूबवर जीतू-जान (Jeetu Jaan) नावाने प्रसिद्ध असलेल्या यूट्यूबर जितेंद्रला  (Youtuber Jitendra) आपल्या पत्नीचा खून केल्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. भांडुप पोलिसांनी जितेंद्रला अटक केली आहे. भांडुप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्रची पत्नी कोमल अग्रवाल (Komal Agarwal) हिने काही दिवसांपूर्वी घरात पंख्याला लटकून गळफास घेतला होता. या प्रकरणाच्या तपासातूनच जितेंद्रला अटक करण्यात आली. EXPLAINER: माणसात आढळलेला बर्ड फ्लूचा स्ट्रेन कितपत घातक? वाचा कसा होतो प्रसार कोमलने आत्महत्या केल्यानंतर हा आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पण, कोमलच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी जितेंद्रच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे त्याच्या विरोधात भांडुप पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. जितेंद्रच्या विरोधात भादवी कलम 304, 323, 306 आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्रनेच आपली मुलगी कोमलची हत्या केली असा आरोप अग्रवाल कुटुंबीयांनी केला आहे. PNB Scam: 'मेहुल चोक्सीची होऊ शकते हत्या';मिस्ट्री गर्लबाबत पत्नीचा खळबळजनक दावा कोमल आणि जितेंद्रमध्ये वाद होत होते, यातून जितेंद्रने तिला मारहाण सुद्धा केली होती, असा जबाब कोमलच्या आई आणि बहिणीने नोंदवला आहे. जितेंद्र हा एक प्रसिद्ध युट्यूबर आहे. जीतू जान नावाने तो ओळखला जातो, त्याचे  284K पेक्षा जास्त सब्सक्रायबर आहे.
First published:

Tags: Crime, Murder, Shocking news, Wife

पुढील बातम्या