हरीश साळवे यांच्याबद्दल तुम्हाला हे माहित आहे का?

ते फक्त बड्या केसेसच घेतात आणि त्यात ते प्रत्येक तासाला काही लाख तर एका दिवसांसाठी 25 ते 30 लाख रूपये घेत असल्याची चर्चा आहे.

  • Share this:

मुंबई, 12 डिसेंबर : राज्य सरकारने मराठा आरक्षणाची घोषणा केली. मराठा आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात आरक्षणाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं. मराठा आरक्षणासाठी न्यायालयात सरकारची न्यायिक बाजू मांडण्यासाठी सरकारकडून ख्यातनाम वकील हरीश साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हरीश साळवे यांना भेटण्यासाठी राज्य सरकारचे प्रतिनिधी मागील महिन्यात लंडनला गेले होते. तर आज दुपारी मुंबईतील एका हॉटेलमध्ये मराठा आरक्षणा संदर्भात ॲड. हरीश साळवे यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, मुख्य सचिव डी.के. जैन, महाधिवक्ता यांनी चर्चा केली.

 हरीश साळवे म्हटलं की ,अगोदर एनकेपी साळवेंचं नाव बहुतांश जणांना आठवतं. एनकेपी साळवे हे काँग्रेसचे मोठे नेते होते आणि स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते. आता बीसीसीआयमुळे शरद पवारांचा सगळीकडे गवगवा असतो, त्याचे एनकेपी साळवेही अध्यक्ष होते.

 एनकेपी साळवे हे राजकीय नेते होते तर त्यांचा मुलगा हरीश साळवे हे नामवंत वकील म्हणून आज ओळखले जातात. हरीश साळवे यांचं नागपूरमध्ये घर आहे आणि धुळ्याशीही त्यांचा संबंध आहे. ते फक्त सुप्रीम कोर्टातच नाही तर वेगवेगळ्या खटल्यांमध्ये हायकोर्टापासून ते आंतरराष्ट्रीय कोर्टापर्यंत सगळ्या ठिकाणी बाजू मांडत असतात.

 एखादा वकील किती यशस्वी आहे हे दोन गोष्टींवरुन ओळखलं जातं. एक तो किती खटले जिंकतो आणि दुसरं तो खटला लढायला किती पैसे घेतो. हरीश साळवेंनी कुलभूषण जाधव यांची केस लढवायला केंद्र सरकारकडून फक्त 1 रुपया फी घेतल्याचं खुद्द परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना स्पष्ट केलं होतं.

 कुलभूषणसाठी एक रुपया घेतला म्हणून सगळ्यांसाठी हीच फी हरीश साळवे घेत असतील असा गैरसमज करून घेऊ नका. देशप्रेम दाखवण्यासाठी हरीश साळवेंनी 1 रुपया घेतलाय.

 इतर वेळेस ते फक्त बड्या केसेसच घेतात आणि त्यात ते प्रत्येक तासाला काही लाख तर एका दिवसांसाठी २५ ते 30 लाख रूपये घेत असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच त्यांच्या फीवरून कळून जाईल की साळवे हे किती मौल्यवान वकील आहेत.

 आता थोडसं हरीश साळवेंनी लढवलेल्या केसेस बघा. देशातल्या बड्या उद्योगपतींपासून ते अनेक राजकीय कांडांपर्यंत साळवेंनी केसेस लढवलेल्या आहेत.

 त्यात व्होडाफोनच्या टॅक्स केसपासून ते टाटांसाठी ते कोर्टात उभे राहिले. भारताचे सॉलीसीटर जनरल म्हणूनही हरीश साळवेंनी काम पाहिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2018 06:04 PM IST

ताज्या बातम्या