मोठी बातमी! कर्जतमध्ये कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या स्टुडिओत अग्नितांडव, आगीचा भीषण VIDEO

मोठी बातमी! कर्जतमध्ये कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या स्टुडिओत अग्नितांडव, आगीचा भीषण VIDEO

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या स्टुडिओ आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी स्टुडिओचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक चित्रपटाचे शूटिंग येथे होत असतात.

  • Share this:

कर्जत, 07 मे: मुंबईजवळीत विविध परिसरात आगीचं सत्र सुरूच. भिवंडीत एशियन पेंट्सच्या गोदामाला लागलेल्या आगीनंतर आता कर्जतमधील आगीची घटना समोर आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांच्या स्टुडिओ आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. नितीन देसाई यांच्या एनडी स्टुडिओमध्ये ही आग लागली. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी स्टुडिओचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक चित्रपटाचे शूटिंग येथे होत असतात.

आज दिनांक 7 मे रोजी येथील एन. डी. स्टुडिओला आग लागली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट नसून सदर घटनास्थळी खालापूरचे तहसीलदार श्री इरेश चपळवार, पोलीस निरीक्षक अनिल विभूते, श्यामभाई साळवी, जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, उपनिरीक्षक बांगर, नितीन परदेशी मंडळ अधिकारी चौक, सचिन मते इत्यादी उपस्थित होते. आगीच्या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.

धुराचे लोट आसमंतात गेल्याचं पाहायला मिळतं आहे. याठिकाणी आग विझवण्याचं काम सुरू असून त्याचे घटनास्थळीचे काही व्हिडीओ देखील समोर आले आहेत. जोधा अकबर या चित्रपटासाठी उभारण्यात आलेला किल्ल्याचा सेट काही प्रमाणात या आगीत जळाला आहे. या दुर्घटनेत झालेल्या आर्थिक नुकसानीची कोणतीही अधिकृत माहिती हाती आलेली नाही.

रायगडमधील कर्जत येथे असणाऱ्या एन. डी. स्टुडिओच्या परिसरात या ठिकाणी अनेक सुप्रसिद्ध हिंदी आणि मराठी सिनेमांचे सेट आहेत. परंतु, सध्या लागलेली आग ही नवीन मालिकेच्या चित्रिकरणासाठी उभारण्यात आलेल्या सेटला लागल्याची सांगण्यात येत आहे. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र, आजूबाजूच्या वणव्यामुळे हा सेट जळाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दूर-दूरवरून धुराचे लोट दिसत होते. या आगीत पूर्ण सेट जळून खाक झाला आहे.

Published by: News18 Desk
First published: May 7, 2021, 3:10 PM IST

ताज्या बातम्या