पाक व्हाया बांगलादेशातून भारतात बनावट नोटा;टोळीचा पर्दाफाश

पाक व्हाया बांगलादेशातून भारतात बनावट नोटा;टोळीचा पर्दाफाश

या नोटा पाकिस्तानातून बांगलादेशमार्गे भारतात आणल्या जात होत्या. काही दिवसांपुर्वी एका काँग्रेस नेत्यालाही या प्रकरणात पोलिसांनी अटक केली होती.

  • Share this:

मुंबई,17 ऑक्टोबर: डीआरआयने एका बनावट नोटा पाकिस्तानातून भारतात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. या नोटा पाकिस्तानातून बांगलादेशमार्गे भारतात आणल्या जात होत्या. काही दिवसांपुर्वी एका काँग्रेस नेत्यालाही या प्रकरणात पोलिसांनी अटक केली होती.

या नोटा बाजारात अर्ध्या किमतीला विकल्या जात होत्या. रात्री उशिरा डिआरआयनं या प्रकणी एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार तो रीपाईचा नेता आहे. या नोटा बांगलादेशमध्ये छापल्या जात होत्या. आतापर्यंत 25 लाखापेक्षा जास्त नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या नकली नोटा इतक्या चांगल्या दर्जाच्या आहेत, की खऱ्या आणि खोट्या नोटांमध्ये फरक लवकर समजून येत नाही. नोटबंदीनंतर नकली नोटांच्या संदर्भात केली गेलेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते आहे. खोट्या नोटांचे चलनवलन थांबवणे हेही नोटाबंदीचे एक मुख्य ध्येय होते.

बनावट  नोटा पकडल्याचीही मुंबईतील गेल्या दोन महिन्यातील तिसरी घटना आहे.

First published: October 17, 2017, 4:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading