Home /News /mumbai /

मुंबईत 1500 रुपयांत Corona लसीकरणाचे Fake सर्टिफिकेट, टोळीचा पर्दाफाश; 2 जण ताब्यात

मुंबईत 1500 रुपयांत Corona लसीकरणाचे Fake सर्टिफिकेट, टोळीचा पर्दाफाश; 2 जण ताब्यात

Representative Image

Representative Image

मुंबईत कोरोनाचा (Mumbai Corona) प्रार्दुभाव वाढत चालला आहे. त्यात शहरात लसीकरणाचा (Vaccination) वेग वाढवला आहे. मात्र अशातच लसीकरणाच्या सर्टिफिकेट (Vaccination Certificate) संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे.

    मुंबई, 20 जानेवारी: मुंबईत कोरोनाचा (Mumbai Corona) प्रार्दुभाव वाढत चालला आहे. त्यात शहरात लसीकरणाचा (Vaccination) वेग वाढवला आहे. मात्र अशातच लसीकरणाच्या सर्टिफिकेट (Vaccination Certificate) संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. कोरोना लसीचे (Corona Vaccination) बनावट सर्टिफिकेट बनवणाऱ्या टोळीचा मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) पर्दाफाश केला आहे. गोरेगाव परिसरात मोठी कारवाई करत गुन्हे शाखेच्या पथकानं दोन आरोपींना अटक केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही टोळी लस न घेतलेल्यांना लसीच्या दोन्ही डोसचे बनावट सर्टिफिकेट (Fake Certificate) देत होती आणि त्याबदल्यात 1500 रुपये घेतले जात होते. या टोळीचा पर्दाफाश झाल्यानंतर गुन्हे शाखेचे पथक संपूर्ण प्रकरणाच्या तपासात गुंतले आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव पश्चिम भागातील काही तरुण कोरोना लसीच्या दोन्ही डोसचे बनावट सर्टिफिकेट बनवण्याचे काम करत असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून मिळाली. ही टोळी कोरोना लसीच्या दोन्ही डोसचे बनावट प्रमाणपत्र बनवून फसवणूक करत होती. याचा सुगावा मिळाल्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने बीएमसीच्या पथकासह गोरेगाव परिसरात छापा टाकला आणि तेथून दोन आरोपींना अटक केली. टीम इंडियातील अर्धा डझन खेळाडू Corona पॉझिटिव्ह, जाणून घ्या मेडिकल स्टेट्स अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मुंबई गुन्हे शाखेने लसीची अनेक बनावट सर्टिफिकेटही जप्त केली आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ही टोळी ज्यांनी कोविड-19 लसीचा डोस घेतलेला नाही अशा लोकांना कोरोना लसीच्या दोन्ही डोसचे बनावट प्रमाणपत्रे देत होती. आतापर्यंत या लोकांनी एकूण 70 ते 75 जणांना कोरोना लसीकरणाची बनावट प्रमाणपत्रे विकली आहेत. बनावट प्रमाणपत्राच्या बदल्यात ही टोळी लोकांकडून 1500 रुपये घ्यायची. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, लसीचे बनावट प्रमाणपत्र बनवण्याचा हा धंदा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होता. या कारवाईनंतर या दोन आरोपींशिवाय या टोळीत आणखी कोण-कोण सामील आहेत आणि या टोळीने आतापर्यंत किती लोकांची अशा प्रकारे बनावट सर्टिफिकेट बनवून फसवणूक केली आहे, याचा शोध घेण्यामध्ये गुन्हे पथक गुंतले आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Corona vaccination, Corona vaccine, Mumbai News

    पुढील बातम्या