रेल्वेमध्ये पोस्टर लावणाऱ्या बंगाली बाबाचा पर्दाफाश, 4 जणांना अटक

मुंबईकरांनो, ही बातमी तुम्हाला सावधान करण्यासाठी आहे. रेल्वेमधून जाताना तुम्ही 'अकरम शाह बंगाली बाबा' नावाची अनेक पोस्टर्स पाहिली असतील.

News18 Lokmat | Updated On: Nov 27, 2018 11:01 AM IST

रेल्वेमध्ये पोस्टर लावणाऱ्या बंगाली बाबाचा पर्दाफाश, 4 जणांना अटक

मुंबईकरांनो ही बातमी तुम्हाला सावधान करण्यासाठी आहे. रेल्वेमधून जाताना तुम्ही 'अकरम शाह बंगाली बाबा' नावाची अनेक पोस्टर्स पाहिली असतील. बरं अनेकांनी तर या पोस्टरवरील नंबरवर फोनही केला असेल. तर मग आता पुढे वाचाच...

रेल्वे गाड्यांमध्ये भोंदूबाबाच्या जाहिराती चिकटवणाऱ्या टोळीचा विरार आरपीएफने पर्दाफाश केला आहे. यात बंगाली भोंदू बाबासह ३ जणांना अटक करण्यात आली आहे.

रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजार, ट्रेनचे दरवाजे ब्लॉक करणाऱ्या टोळक्यानं विरार आरपीएफने चांगलीच अद्दल घडवली आहे. विरार आरपीएफचे जी .एन .मल्ल यांच्या हाती एक सीसीटीव्ही लागला आणि तिथूनच या बंगाली बाबाचं धाबं दणाणलं.

Loading...

आरपीएफला पक्की खबर मिळाल्यानंतर मल्ल यांनी हेड कॉन्स्टेबल मुकेश त्यागी, प्रकाश नोटियाल, कॉन्स्टेबल सीताराम, आशिष कादियान याचं एक पथक तयार करून भायंदर स्थानकावर गुप्त पाळत ठेवली.

यातून रशीद अलाउदिन उर्फ साजिद २७ वर्षे, साकिब इस्तीयाक १८, मेहबूब अली शब्बीर अली २९ वर्षे, यांना पोलिसांनी अटक केली आहे.  

हे तिघे 204, साई बिल्डिंग प्रगती नगर नालासोपारा येथे राहत होते. ते मूळ उत्तर प्रदेश मेरठचे राहणारे आहेत. त्यांना सोमवारी विरार आरपीएफने अटक केली आहे.

बरं इतकंच नाही तर यांच्याकडून तब्बल २०० पोस्टर्स जप्त करण्यात आली आहे. सोमवारी भोंदूबाबा रियाज शौकीन चौहान यालाही पोलिसांनी अटक केली आहे. रियाज हा मेरठ शहरात भोंदुबाबांचं काम करतो. सोमवारी तो मेरठला जायला निघाला होता. पण तितक्यात पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

रेल्वेमध्ये पोस्टर लावण्यासाठी हा भोंदुबाबा या मुलांना दिवसाचे जेवणासाठी ५०० रुपये आणि महिन्याला ५ हजार रुपये देत होता अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान विरार रेल्वे स्थानक आरपीएफ इंचार्ज जीएन मल्ल यांनी सांगितलं की, हे लोक पश्चिम आणि मध्य रेल्वेमध्ये फार सक्रिय होते. त्यांच्यावर अंधेरी, भायंदर, विरार आणि मध्ये रेल्वेच्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून हे मेरठमधून पोस्टर छापून तिकडेच भोंदुबाबांचं रॅकेट असल्याचं मल्ल यांनी सांगितलं.    

त्यामुळे रेल्वेत लागणाऱ्या या पोस्टरवर किती विश्वास ठेवायचा याचा विचार आता प्रत्येक प्रवाशाने केला पाहिजे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 27, 2018 10:47 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...