त्याने 500 च्या 8 नोटा बळजबरीने मशीनमध्ये जमा केल्या, पद्धत पाहून बँकेचे अधिकारी गेले चक्रावून!

त्याने 500 च्या 8 नोटा बळजबरीने मशीनमध्ये जमा केल्या, पद्धत पाहून बँकेचे अधिकारी गेले चक्रावून!

ही घटना आहे २७ फेब्रुवारीची. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील TJSB बँकेचे एटीएम सेंटर आहे. या एटीएम मशिनमध्ये पैसे भरता ही येतात आणि काढता ही येतात

  • Share this:

अजित मांढरे, प्रतिनिधी

ठाणे, 09 मार्च : बनावट नोटा बनवून त्या बाजारात विविध मार्गे वटवणाऱ्या टोळीने आता थेट बॅंकांमध्येच बनावट नोटा वटवायला सुरूवात केली असल्याचं प्रकरण समोर आलं आहे. ठाण्यात अशीच एक धक्कादायक घटना समोर आलीये ज्यात एका तरुणाने बनावट नोटा चक्क बॅंकेत भरल्या आणि बँकेची फसवणूक केली.

काही दिवसांपूर्वी ठाण्यातील घोडबंदर रोडवरील  कावेसर, वाघबीळ येथील TJSB बँकेच्या एटीमचा एका व्हिडिओ समोर आला होता. या सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसतंय एक तरुण बराच काळ एटीएममध्ये मशिन सोबत काही तरी करताना दिसत होता. एटीएमबाबत नीट माहिती नसल्याने या तरुणाला पैसे काढण्यास अडचणी येत आहे, असं तुम्हाला वाटत असेल. पण हा तरुण या एटीएम सेंटरमध्ये एवढा वेळ काय करत होता हे ऐकल्यावर तुम्हाला धक्काच बसेल.

ही घटना आहे २७ फेब्रुवारीची. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील TJSB बँकेचे एटीएम सेंटर आहे. या एटीएम मशिनमध्ये पैसे भरता ही येतात आणि काढता ही येतात. हा तरुण या एटीएम सेंटरमध्ये पैसे भरण्यासाठी आला होता. त्याने त्याच्याकडील ५०० रुपयांच्या १०० नोटा म्हणजेच ५० हजार रुपये त्याने मनी डिपॉझिट एटीएममध्ये भरले. मात्र, या १०० नोटांपैकी ८ नोटा मनी डिपॉझिट एटीएमने स्वीकारल्या नाही. त्या तरुणाने पुन्हा त्या ८ नोटा एटीएममध्ये भरल्या पुन्हा एटीएमने त्या स्वीकारल्या नाहीत. तरीही त्या तरुणाने त्या ८ नोटा मनी डिपॉझिट एटीएममध्ये जबरदस्तीने भरल्या. जेव्हा टीजेएसबी बँकेंच्या अधिकाऱ्यांनी ते एटीएम रिफिल करण्या करता खोलले तेव्हा त्यांचे डोळे उघडेच राहिले.

जेव्हा बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी ते एटीएम उघडले तेव्हा आतापर्यंत कधी न पाहिलेला प्रकार त्यांनी पाहिला. त्या मशीन ५०० रुपयांच्या ८ नोटा अडकल्या होत्या. त्या नोटा बाहेर काढून त्यांची शहनिशा केली असता सर्व नोटा एकाच नंबरच्या होत्या. अर्थात त्या बनावट होत्या हे बॅंकेच्या अधिकाऱ्यांना तात्काळ लक्षात आलं.

बनावट नोटा जबरदस्तीने एटीएममध्ये भरल्याचा प्रकार बॅंकेच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ त्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी एटीएमचे सीसीटीव्ही तपासले असता. त्यात हाच पुरुष बराच वेळ वारंवार एटीएम मशिन मध्ये पैसे भरताना दिसला. अधिक चौकशी केली असता त्या तरुणाचे नाव चेतन मठालिया असून तो सुरज वॉटर पार्क जवळील वसंत लीला कॉम्प्लेक्समध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत  त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्या ५०० रुपयांच्या ८ नोटा बनावट नोटा होत्या ही धक्कादायक माहिती समोर आली.

आतापर्यंत बनावट नोटा या थेट बाजारात वटवल्या जात होत्या पण बनावट नोटा थेट बॅंकेत भरण्याच्या या प्रकारामुळे ठाण्यातील बॅंकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या बनावट नोटांच्या टोळीला आळा कसा घालायचा याकरता आता सामान्य माणसांसोबतच बॅंकांनीच सतर्क राहणे गरजेचं आहे.

First published: March 9, 2020, 4:35 PM IST

ताज्या बातम्या