Home /News /mumbai /

BREAKING : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल 7 कोटींच्या बनावट नोटा जप्त, रॅकेटचा पदार्फाश

BREAKING : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल 7 कोटींच्या बनावट नोटा जप्त, रॅकेटचा पदार्फाश

मुंबईत 7 कोटींच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा डाव मुंबई पोलिसांनी उधळला

मुंबईत 7 कोटींच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा डाव मुंबई पोलिसांनी उधळला

मुंबईत 7 कोटींच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा डाव मुंबई पोलिसांनी उधळला

    मुंबई, 26 जानेवारी : मुंबईतील दहिसर भागात बनावट नोटा तयार करणाऱ्या रॅकेटचा मुंबई क्राईम ब्रांचने पर्दाफाश केला आहे. तब्बल 7 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहे. मुंबईमध्ये आतापर्यंतही ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात नोटा सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. (Fake 2000 rupees notes Rs.7,00,00,000 caught by mumbai police) मुंबईतील दहिसर (dahisar) परिसरात क्राईम ब्रांचने धडक कारवाई करत एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. 7 कोटी रुपयांच्या नोटा मुंबईच्या बाजारात चलनात आणण्याचा डाव या रॅकेटचा होता. पण पोलिसांनी वेळीच हा डाव उधळून लावला. पोलिसांनी एकूण सात आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी एकूण 7 आरोपींना अटक केली आहे. ही एक आंतरराष्ट्रीय टोळी आहे. या आरोपींकडून 7 मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.  इतक्या मोठ्या प्रमाणात नोटा सापडून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. औरंगाबादमध्ये इंजिनिअरने घरीच छापल्या नोट्या! दरम्यान, मागील महिन्यातच   औरंगाबाद (Aurangabad)मधील इंजिनिअरने झटपट श्रीमंत होण्यासाठी बनावट नोटा छापल्याता प्रकार समोर आला होता.  संगणक इंजिनिअर असलेल्या औरंगाबादच्या इंजिनिअरने झटपट श्रीमंत होण्यासाठी बनावट नोटा छापण्याचा कारखाना सुरू केला होता. धक्कादायक म्हणजे, यापूर्वीदेखील बनावट नोटा छापल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर देखील झटपट श्रीमंत होण्यासाठी समरान ऊर्फ लक्की याने बनावट नोटा छापण्यास सुरुवात केली होती. कारागृहातून सुटल्यावर समरान याने आपल्या मित्रांसोबत बनावट नोटा छापण्याचा कारखाना सुरू केला. मुकुंदवाडी येथे भाड्याच्या खोलीत समरान आपल्या मित्रांसोबत बनावट नोटा छापत होता. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी छापा टाकून सर्व आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरुन बनावट नोटांचा साठा जप्त केला आहे. यामध्ये 500 रुपये, 100 रुपये आणि 50 रुपयांच्या बनावट नोटांचा समावेश होता. यासोबतच पोलिसांनी घटनास्थळावरुन कम्प्युटर, प्रिंटर, कागद असा ऐवजही ताब्यात घेतला आहेत.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या