अयोध्येत उद्धव ठाकरेंच्या सभेला उत्तरप्रदेश पोलिसांनी परवानगी नाकारली

अयोध्येत उद्धव ठाकरेंच्या सभेला उत्तरप्रदेश पोलिसांनी परवानगी नाकारली

उद्धव ठाकरे यांची नियोजित सभा ही बाबरी मस्जिद आणि राम जन्मभूमी स्थळापासून जवळ आहे.

  • Share this:

22 नोव्हेंबर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यातील सभेचा अडथळा कायम आहे. २४ नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे अयोध्येत पोहोचणार आहे. त्यांच्या नियोजित सभेला उत्तरप्रदेश पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राम कथा पार्क इथं उद्धव ठाकरे सभा घेणार होते. परंतु, उत्तरप्रदेश पोलीस प्रशासनाने या सभेला परवानगी नाकारली आहे. ही जागा वादग्रस्त असून बाबरी मस्जिद आणि राम जन्मभूमी स्थळापासून जवळ आहे. त्यामुळे कोणत्याही  विधानामुळे वाद निर्माण होऊ शकतो. आता शिवसेनेनं ही सभा गुलाब बरी इथं घेऊ शकते. ही जागा या वादग्रस्त जागेपासून काही किलोमिटर अंतरावर आहे.

मंगळवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी परवानगी मागितली नसल्याचं म्हटलं होतं. उत्तरप्रदेश पोलिसांकडून आम्ही सभेसाठी मुळात परवानगी मागितलीच नाही. अयोध्या काही पाकिस्तानात नाही, त्यामुळे सभेला परवानगी कशाला मागायाची असा सवाल राऊत यांनी उपस्थितीत केला होता.

उद्धव ठाकरे शरयू नदीच्या किनाऱ्यावर आरती करणार आहे.  शरयू नदीवर कार्यक्रम आटोपल्यानंतर पत्रकार परिषद घेणार आहोत असं राऊत यांनी सांगितलं होतं.

दरम्यान, आज उद्धव ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी शिवनेरी किल्ल्यावर गेले होते. महाराष्ट्रचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरीवरील माती एका कलशात भरून अयोध्येतील राम जन्मभूमीतील महंताना देणार आहे.

शिवनेरी किल्यावरील ही माती राम जन्मभूमीत मंदिर निर्माणासाठी देणार आहेत.

=============================

First published: November 22, 2018, 3:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading