Home /News /mumbai /

उलट फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं अभिनंदन करावे, संजय राऊतांचा टोला

उलट फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं अभिनंदन करावे, संजय राऊतांचा टोला

मेट्रो कारशेडसाठी फडणवीस सरकारने रात्रीच्या अंधारात दोन हजारांवर झाडे निर्घृणपणे कापली होती. पर्यावरणवाद्यांनी त्याविरोधात मोठाच उद्रेक केला होता.

    मुंबई, 13 ऑक्टोबर :  गेल्या अनेक वर्षांपासून वादात असलेल्या आरेमधील मेट्रो कारशेड अखेर कांजूरमार्गला हलवण्यात येणार आहे.  ठाकरे सरकारच्या या निर्णयावर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली होती. तर, 'टीका करण्यापेक्षा फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले पाहिजे', असा टोला संजय राऊत यांनी लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील 800 एकर जागेची जंगल म्हणून घोषणा करत मेट्रो कारशेड प्रकल्प हा कांजूरमार्ग इथं हलवण्याची दोन दिवसांपूर्वी घोषणा केली होती. त्यांच्या या निर्णयाचे पर्यावरण प्रेमीने स्वागत केले तर दुसरीकडे भाजपचे नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. 'आम्ही  पंतप्रधान मोदी यांचा राष्ट्रीय कार्यक्रम राबवला आहे. गंगा शुद्धीकरण, जंगल वाचवा, वाघ वाचवा, हे सर्व पंतप्रधान मोदींचे कार्यक्रम आहे. त मुंबईतील फुफ्फुस असलेल्या जंगलाला आम्ही वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे यात अहंकाराचा मुद्दाच येत नाही. उलट फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन करायला पाहिजे होते' असा टोला संजय राऊत यांनी लगावला. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 2 दिवसात अतीमुसळधार पावसाचा इशारा तसंच, बिहार विधानसभा निवडणूक आम्ही कायम लढवत आलो आहोत. यावेळीही निवडणूक लढवणार आहोत. बिहार मधील काही पक्ष आमच्यासोबत येण्यासाठी तयार आहे. लवकरच आपण पाटण्याला जाणार आहोत. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहितीही राऊत यांनी दिली. त्याआधी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातूनही आरेतील मेट्रो कारशेड हटवण्याबद्दल शिवसेनेनं खुलासा करत भाजपवर टीका केली आहे. 85% रुग्णांनी कोरोनाला हरवलं, 24 तासांत सर्वात कमी रुग्णांची नोंद; पाहा आकडेवारी 'मेट्रो कारशेडसाठी फडणवीस सरकारने रात्रीच्या अंधारात दोन हजारांवर झाडे निर्घृणपणे कापली होती. पर्यावरणवाद्यांनी त्याविरोधात मोठाच उद्रेक केला होता. आता आरेतील ‘कारशेड’ कांजूरमार्गला हलवली यावर भाजपसारख्या विरोधी पक्षाकडून टीका सुरू आहे. श्री. देवेंद्र फडणवीस म्हणतात, ‘‘हा निर्णय दुर्दैवी आहे. केवळ अहंकारातून घेतलेला हा निर्णय आहे’’. श्री. फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते. पर्यावरणप्रेमींनी आरेचे जंगल वाचवण्यासाठी आंदोलन केले. कापलेल्या झाडांवर डोके टेकून अश्रू ढाळले. हा अहंकार होता काय? फडणवीस सरकारने अहंकार बाजूला ठेवून पर्यावरणप्रेमींचा मान राखला असता आणि जंगलातील कारशेड कांजूरला आधीच नेली असती तर काय बिघडले असते? पण त्या वेळीसुद्धा अहंकार आडवा आला', अशी टीका सेनेनं भाजपवर केली. काय म्हणाले होते फडणवीस? 'आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याचा दुर्दैवी निर्णय हा केवळ अहंकारातून झाला आहे. कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्यास 4000 कोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागेल, असे याच सरकारने स्थापन केलेल्या समितीने सांगितले. हा भुर्दंड राज्य सरकार आपल्या अहंकारासाठी कुणाच्या माथी मारू इच्छिते? आणि कशासाठी?' असा सवाल देवेंद्र फडणवीस उपस्थितीत केला होता.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या