मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /गुजरातमध्ये फडणवीसांना टास्क फोर्सचे अध्यक्ष नेमावे, राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा सणसणीत टोला

गुजरातमध्ये फडणवीसांना टास्क फोर्सचे अध्यक्ष नेमावे, राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा सणसणीत टोला

महाराष्ट्रात कोरोनाबाधित (Maharashtra corona cases)  रुग्णांची संख्या लपवली जात असल्याचा आरोप करणारे देवेंद्र फडणवीस यांच्यावर आता  हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांनी जोरदार टीका केली.

महाराष्ट्रात कोरोनाबाधित (Maharashtra corona cases) रुग्णांची संख्या लपवली जात असल्याचा आरोप करणारे देवेंद्र फडणवीस यांच्यावर आता हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांनी जोरदार टीका केली.

महाराष्ट्रात कोरोनाबाधित (Maharashtra corona cases) रुग्णांची संख्या लपवली जात असल्याचा आरोप करणारे देवेंद्र फडणवीस यांच्यावर आता हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांनी जोरदार टीका केली.

 मुंबई, 19 मे: महाराष्ट्रात कोरोनाबाधित (Maharashtra corona cases)  रुग्णांची संख्या लपवली जात असल्याचा आरोप करणारे भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आता राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि कामगार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी जोरदार टीका केली आहे.  गुजरात, मध्य प्रदेश, उत्तरप्रदेश येथे अनेक मृत्यू होत आहेत. हे मृत्यू नेमके कसे कमी करता येईल, याची या संदर्भात एक समिती केंद्र सरकारने गठीत करावी आणि या समितीचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना करावे, असा सणसणीत टोला  मुश्रीफ यांनी लगावला आहे.

हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन चक्रीवादळ आणि राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला.

पत्नीचा झाला मृत्यू अन् तासाभरातच पतीनंही सोडला जीव, एकाच चिथेवर दिला मुखाग्नी

'देवेंद्र फडणवीस हे कोकणात 3 दिवसाच्या दौऱ्यावर आजपासून पळून जात आहेत, त्यानंतर त्यांनी गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यात देखील दौरा करावा असा उपरोधिक टोला मुश्रीफ यांनी फडणवीस यांना लगावला आहे.

राज्यातील असंघटित कामगार म्हणून ओळखल्या गेलेल्या घरेलू काम करणाऱ्या महिला कामगारांना देखील राज्य सरकारने आता दीड हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार त्यांच्या खात्यात पैसे पडतील अशी माहिती  हसन मुश्रीफ यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की, 'राज्यातील घरकामगार एक लाख महिला त्यांना प्रत्येकी दीड हजार रूपये खात्यात मदत टाकली जाणार आहे. घरकामगार कायदा करताना वयाची अट 60 होती. त्यातही लाॅकडाउननंतर बदल केला जाईल. सुमारे 6 लाखांपेक्षा जास्त बांधकाम कामगार यांना ही मदत केली'

देवेंद्र फडवणीस हे कोकण दौरा करत आहेत हे चांगले आहे. आमच्या पालकमंत्र्यांनी  स्थानिक पाहणी केली आज कॅबिनेट बैठकीत चक्रीवादळ परिणाम यावर चर्चा करून मदत विचार केला जाईल, पण फडवणीस यांनी गुजरात राज्यात दौरा करावा, कारण तिथं कोरोनामुळे मृत्यू जास्त आहे, असा सल्लावजा टोलाही मुश्रीफ यांनी लगावला.

आईच्या निधनानंतर टीम इंडियाच्या क्रिकेटपटूचा मोठा निर्णय, तुम्हीही कराल सलाम!

'गुजरात, उत्तर प्रदेशात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण जासत आहे. या भागात मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी फडवणीस यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स नेमावी, असा टोला मुश्रीफ यांनी फडवणीस यांना लगावला.

'चंद्रकांत पाटील यांचे सरकार मराठा आरक्षण देवू शकले नाही म्हणून आता आरक्षण यावरून राजकारण करत आहे', भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक मुंबईत झाली, त्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात आली त्यानंतर आज हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.

First published: