मुंबई, ३० जून : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा (uddhav thackeray resigns as cm) दिल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. आता फडणवीस आणि एकनाथ शिंदे सरकार (devendra fadanvis) स्थापन होणार आहे. त्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. फडणवीस आणि एकनाथ शिंदे (eknath shinde) आजच राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे, त्यानंतर आज किंवा उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे हे गोव्याहून मुंबईकडे निघाले आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आज दुपारी ३ः३० वाजता राजभवनावर जाणार आहे. यावेळी फडणवीस आणि शिंदे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर
फडणवीस सरकारचा आज संध्याकाळी किंवा उद्या शुक्रवारी शपथविधी होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे शपथ घेतील. त्यांच्यासोबत इतर आणखी ५ नेते हे मंत्रिपदाची शपथ घेण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे हे गोव्यातून मुंबईकडे निघाले आहे. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया दिली.
उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे आम्हाला त्याचा आनंद नाही. जी काही परिस्थिती उद्भवली होती, जे आमदार आमच्यासोबत आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये जे काही वाईट अनुभव होते. त्याबद्दल त्यांना सांगितले होते. त्यांनी जर आधी निर्णय घेतला असता तर आज ही वेळ आली नसती. त्यांनी राजीनामा दिला त्याचा आम्हाला बिल्कुल आनंद नाही. त्यांच्याबद्दल कालही आदर होता आणि आज आदर आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले,
मी शिवसेनेचा नेते आहे. आमच्याकडे ५० आमदारांचे पाठबळ आहे. सरकार स्थापनेची जी काही प्रक्रिया आहे त्याचे अधिकारी मला आमदारांनी दिले आहे. मी मुंबईमध्ये चाललो आहे. मुंबईमध्ये गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यानंतर निर्णय होणार आहे. राज्यपाल महोदय यांना भेटणार आहे. त्या भेटीनंतर आमची पुढील रणनीती ठरणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार आहे, असंही शिंदे यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.