Elec-widget

SPECIAL REPORT : 40 हजार कोटींचं नेमकं गौडबंगाल काय? फडणवीस का बनले होते मुख्यमंत्री?

SPECIAL REPORT : 40 हजार कोटींचं नेमकं गौडबंगाल काय? फडणवीस का बनले होते मुख्यमंत्री?

भाजप खासदार अनंत कुमार हेगडे यांच्या या दाव्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 डिसेंबर :  केंद्र सरकारनं महाराष्ट्राला दिलेल्या ४० हजार कोटी रुपये पुन्हा केंद्राकडं वळते करण्यासाठी फडणवीसांना औटघटकेचं मुख्यमंत्री बनवण्यात आल्याचा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते अनंत कुमार यांनी केला आहे. त्यामुळं राज्यात नव्या वादाता तोंड फुटलं आहे.

भाजप खासदार अनंत कुमार हेगडे यांच्या या दाव्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. केंद्र सरकारनं महाराष्ट्राला दिलेले 40 हजार कोटी रुपये पुन्हा केंद्राकडं वळते करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना 80 तासांकरता  मुख्यमंत्री बनवण्यात आल्याचा गौप्यस्फोट  हेगडे यांनी केला.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारकडून त्या निधीचा दुरुउपयोग झाला असता आणि त्यासाठीचं भाजपनं फडणवीसांना औटघटकेचं मुख्यमंत्रिपद दिल्याचा दावाही हेगडे यांनी केला. आता राज्यात त्यावरुन राजकारण सुरू झालंय. सत्ताधाऱ्यांच्या हाती आयताचं मुद्दा लागला.

दरम्यान, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी अनंत कुमार यांचा दावा खोडून काढला आहे.

Loading...

खरंतर देवेंद्र फडणवीसांना अवघ्या तीन दिवसांत मुख्यमंत्रिपदावरुन पाय उतार व्हावं लागलं होतं. आणि त्यामुळ त्यांच्यावर बरीच टीकाही झाली. आता अनंतकुमार यांच्या या दाव्यामुळे एकदा नव्या वादाला तोंड फुटलं असून   40 हजार कोटी रुपयांचं नेमकं गौडबंगाल आहे तरी काय? असा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 2, 2019 09:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com