Home /News /mumbai /

फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाऐवजी केली होती 'ही' मागणी, या नेत्याचे सुचवले होते नाव, संजय राऊतांचा दावा

फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाऐवजी केली होती 'ही' मागणी, या नेत्याचे सुचवले होते नाव, संजय राऊतांचा दावा

'कधी काळी आपलाच ज्युनियर मंत्री असलेल्या शिंदे यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ फडणवीस यांच्यावर आली. हे त्यांच्या कर्माचे फळ आहे.

    मुंबई, 03 जुलै :  'महाराष्ट्र भाजपचे एकतर्फी नेतृत्व फडणवीस (devendra fadanvis) यांच्या हाती होते, पण अमित शहा व फडणवीसांत सख्य नव्हते. ‘‘मला उपमुख्यमंत्रिपद नको. चंद्रकांत पाटील यांना ते द्या. मला भाजप प्रदेशाध्यक्ष करा’’, अशी त्यांची विनंती शेवटच्या क्षणी फेटाळण्यात आली, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी पुकारून भाजपसोबत आता सरकार स्थापन केले आहे. पण मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्रिपदासाठी फडणवीस यांनी शपथ घेतली. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या सामनाच्या रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी शिंदे सरकार आणि फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले व देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री व्हावे असे फर्मान भाजप हायकमांडने सोडले. हाच खरा भूकंप आहे. पुन्हा मुख्यमंत्री होण्याची झेप फडणवीस यांच्या दिल्लीतील नेत्यांनी रोखली व शिंदे यांना बळ दिले. फडणवीस यांच्यासाठी हा धक्का आहे. महाराष्ट्र भाजपचे एकतर्फी नेतृत्व फडणवीस यांच्या हाती होते, पण अमित शहा व फडणवीसांत सख्य नव्हते. ‘‘मला उपमुख्यमंत्रिपद नको. चंद्रकांत पाटील यांना ते द्या. मला भाजप प्रदेशाध्यक्ष करा’’, अशी त्यांची विनंती शेवटच्या क्षणी फेटाळण्यात आली, असा दावाही राऊत यांनी केला. 'कधी काळी आपलाच ज्युनियर मंत्री असलेल्या शिंदे यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ फडणवीस यांच्यावर आली. हे त्यांच्या कर्माचे फळ आहे. 2019 मध्ये सत्तेचा 50-50 टक्के फॉर्म्युला त्यांनी स्वीकारला नाही व महाविकास आघाडीचे सरकार त्यामुळे निर्माण झाले. उद्धव ठाकरे हे अडीच वर्षे मुख्यमंत्री झाले व आता बंडखोर शिवसैनिक शिंदे यांना हे पद भाजप हायकमांडने दिले. काळाने फडणवीसांवर घेतलेला हा सूड आहे, अशी टीकाही राऊतांनी केली.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Maharashtra News

    पुढील बातम्या