Home /News /mumbai /

ठाकरे सरकारचा फडणवीसांना आणखी एक दणका, 'हा' निर्णय केला रद्द

ठाकरे सरकारचा फडणवीसांना आणखी एक दणका, 'हा' निर्णय केला रद्द

मनोरा आमदार निवास्थानाच्या पुनर्बांधणीचे काम फडणवीस सरकारच्या काळात केंद्र सरकारच्या अखत्यारीतील संस्थेला देण्यात आले होते.

    मुंबई, 09 डिसेंबर : महाविकास आघाडी सरकारला (maha vikas aghadi government)वर्षपूर्ण झाले आहे. सत्तेवर आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारकडून फडणवीस सरकारच्या (Devendra fadanvis) निर्णयाला स्थगिती देण्याचा सपाटा अजूनही सुरूच आहे. आता मुंबईतील मनोरा आमदार निवासस्थानाच्या (manora mla hostel mumbai) पुनर्बांधणीच्या  कामाला स्थगिती देण्यात आली आहे. मनोरा आमदार निवास्थानाच्या पुनर्बांधणीचे काम फडणवीस सरकारच्या काळात केंद्र सरकारच्या अखत्यारीतील नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच 'एनबीसीसी'ला देण्यात आले होते. आता हा निर्णयच राज्य सरकारने रद्द केला आहे, असं वृत्त महाराष्ट्र टाइम्सने दिले आहे. आता हे काम राज्य सरकारचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे. आंध्र प्रदेशातील गूढ आजाराचे धक्कादायक सत्य समोर;एकाचा मृत्यू तर 550 जणांना बाधा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्ताधिकार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच, मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या एन.बी.सी.सी. यांच्याऐवजी पुढील काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यास तसेच या कामाच्या खर्चास तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी देण्यास उच्चाधिकार समितीने मंजुरी देण्यात आले आहे. नवीन आमदार निवासाचे काम तातडीने सुरू करून जलदगतीने पूर्ण करावे, अशा सूचना सभापती व अध्यक्षांनी यावेळी केल्या. या प्रसिद्ध अभिनेत्रीची आत्महत्या, काही दिवसांपूर्वी झाला होता साखरपुडा गेल्या अनेक वर्षांपासून मनोरा या नवीन इमारतीच्या पुनर्बांधणीचे काम सुरू होते. या कामाचा आढावा घेण्यासाठी  मंगळवारी विधानभवनात बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती नीलम गोऱ्हे, सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) अशोक चव्हाण, संसदीय कार्यमंत्री अनिल परब, ऊर्जामंत्री डॉ. नितिन राऊत, मुख्य सचिव संजयकुमार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विधान मंडळाचे सचिव राजेंद्र भागवत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे) ए.बी. गायकवाड आदी या वेळी उपस्थित होते.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या