हिंमत असेल तर मुस्लीम आरक्षणाला विरोध असल्याचं सांगा, फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान

हिंमत असेल तर मुस्लीम आरक्षणाला विरोध असल्याचं सांगा, फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान

देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत पत्रकारांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली

  • Share this:

मुंबई, 03 मार्च : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देणार अशी घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेवरून भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुस्लीम आरक्षणाला विरोध असेल तर उद्धव ठाकरेंनी जाहीर करावं, असं आव्हानच फडणवीसांनी दिलं. तर फडणवीस यांच्या या आव्हानाला जितेंद्र आव्हाड यांनी सणसणीत उत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत पत्रकारांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली.  विधानपरिषदेच्या चर्चेमध्ये नवाब मलिक यांनी 5 टक्के मुस्लिम आरक्षण देणार ही घोषणा केली आहे. जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपलं मत सांगितलं असेल तर शासनाचं मत होत नाही. नवाब मलिक यांनी आज विधान परिषदेत शासनाच्या वतीने अधिकृतरित्या सांगितलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत न सांगता विधानसभेत सांगावं. त्यांनी हिंमतीने 5 टक्के मुस्लिमांना आमचा विरोध आहे, असं सांगावं धर्माच्या आधारावर आरक्षण मान्य नाही. हे त्यांनी हिंमतीने सांगावं, पण ते गोलमोल उत्तर देत आहे. जर मुस्लिम समाजाला  50 टक्क्याच्या मर्यादेत आरक्षण दिलं तर ओबीसी आणि मराठा समाजावर परिणाम होईल. याबद्दल मुख्यमंत्री स्पष्ट भूमिका मांडावी, असं आव्हान केलं आहे.

कर्जमाफीवर सरकारचे उत्तर नाही - फडणवीस

कर्जमाफीवर सरकार काही बोलत नाही. शेतकऱ्यांना पुर्णपणे कर्जमाफी मिळाली नाही.  जो प्रश्न विचारले त्यांचे उत्तर नाही.  कर्जमाफी कितीची घोषणा केली पण प्रत्यक्षात कर्जमाफी केली अत्यंत कमी आहे,  म्हणून आम्ही आज सभात्याग केलं, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

'मुख्यमंत्र्यांना विभागात काय चालतंय हे कळत नाही'

तसंच,  महिला अत्याचारामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. महिला अत्याचार गुन्हेगारी - गृहमंत्र्यांनी आधीच्या सरकारच्या काळातील घटना सांगितल्या आहे. पण आताच्या सरकारने काही   केले नाही फक्त  गृहमंत्र्यांनी भाषण केले. मुळात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांचं विभाग काय काम करतोय, याबद्दल काहीही माहिती नाही, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

 जितेंद्र आव्हाडांचा फडणवीसांना टोला

गेल्या 5 वर्षामध्ये मुस्लीम समाजाला बाजूला करण्याचं काम भाजपने केलं होतं. आता भाजपने आम्हाला मुळीच मुस्लिम आरक्षणावरून काय करायचे हे शिकवू नये, असा सणसणीत टोला राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री  जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीस यांना लगावला.

First published: March 3, 2020, 6:40 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading