Home /News /mumbai /

12 आमदारांच्या निलंबनावर फडणवीस संतापले, ठाकरे सरकारवर केला गंभीर आरोप

12 आमदारांच्या निलंबनावर फडणवीस संतापले, ठाकरे सरकारवर केला गंभीर आरोप

ठाकरे सरकारने स्टोरी तयार करून ही कारवाई केली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी दिली

    मुंबई, 05 जुलै : पावसाळी अधिवेशनात (monsoon season Maharashtra) तालिका अध्यक्षांवर धावून जाणे आणि गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित  (12 BJP MLAs suspended ) करण्यात आले आहे. या कारवाईवर भाजपचे कामकाजावर बहिष्कार घातला आहे. ठाकरे सरकारने स्टोरी तयार करून ही कारवाई केली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी दिली. 'Obc आरक्षणाच्या मुद्यावर आम्ही सरकारला उघडे पडले. त्यामुळे सरकारने खोटे आरोप लावून आमच्या आमदारांना निलंबित केले आहे. आमच्या 106 आमदारांना निलंबित केले तरी आम्ही लढत राहू. आमचे एक वर्ष काय पाच वर्ष जरी निलंबित केलं तरी काही फरक पडत नाही. माझ्यावर हक्काभंग आणला तरी काही फरत पडत नाही, असं फडणवीस म्हणाले. भाजपच्या डझनभर आमदारांचं निलंबन, वाचा 12 निलंबित आमदारांच्या नावाची यादी 'आज सभागृहात पहिल्यांदा बाचाबाची झाली नाही. अध्यक्षांच्या दालनात वाद होत असतो.  तरी कुणीला निलंबित करत नाही. पण स्टोरी तयार करून कारवाई करण्यात आली. भाजपच्या एकाही आमदाराने शिवी दिली नाही.  शिवसेनेचे काही आमदार येवून वाद घातला. त्यावेळी शेलार यांनी वाद मिटवला आणि आम्ही गळाभेट घेवून बाहेर आलो', असंही फडणवीस यांनी सांगितलं. 'आमचे आमदार कमी करण्यासाठी या सरकारने प्रयत्न केला आहे. खरं म्हणजे, मराठा समाजाला फसवणूक करण्याचे काम चालले आहे. यात सरकार फेल गेले आहे. सरकार खोटे बोलत आहे. केंद्राकडे रिपोर्ट पाठवण्याचे काम सुरू आहे. पण  रिपोर्ट सांगतो की, आधी सरकारला मागास आयोग तयार करावा लागेल. यांचं असं आहे की, लग्न झालं नाही पण बारश्याची तयारी आहे', अशी टीकाही फडणवीसांनी केली. 'ही कारवाई केल्या शिवाय केंद्राकडे कोणताही ठराव पाठवून उपयोग नाही. ठाकरे सरकारच कमिशनच त्यांना सांगते, पण हे बाहेर खोटे सांगत आहे. या सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होईपर्यंत ओबीसी आरक्षण द्यायचे नाही', असा आरोपही फडणवीसांनी केला. 5 हजारांची गुंतवणूक ते 34 हजार कोटींचे मालक; राकेश झुनझुनवाला यांचा प्रवास तर, आज सभागृहात जी काही घटना घडली त्यावर जी शिक्षा सुनावली ही तालिबानी कारवाई आहे.  याचा मी निषेध करतो. मी किंवा माझ्या कुठल्याही सदस्याने शिवाय दिली नाही. उलट जे लोक पुढे गेले त्यांना मी मागे खेचले, असं निलंबित आमदार आशिष शेलार म्हणाले. ओबीसी आरक्षणावर बोलू ना दिल्याने आमचा त्रागा सुधा व्यक्त करू दिले नाही. शिवी देणारे सदस्य हे भाजपचे नव्हते. तरी मी माफी मागतो असे सांगितले. हे तालिका सभापतींनी मान्य केले. ओबीसी समाजाला आरक्षणाचा पासून वंचित करण्याचा प्रयत्न हा भुजबळ यांचा आहे, असंही शेलार म्हणाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या