ठाकरे सरकार देणार फडणवीसांना दणका, प्रकल्पांबद्दल घेणार मोठा निर्णय

ठाकरे सरकार देणार फडणवीसांना दणका, प्रकल्पांबद्दल घेणार मोठा निर्णय

राज्यावर ६ लाख ७१ हजार कोटीपेक्षा कर्ज आहे, त्याचा आढावा घेतला जाईल, असं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं

  • Share this:

मुंबई, 03 डिसेंबर : महाविकासआघाडीने सरकार स्थापन केल्यानंतर कामाचा धडाका लावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच्या सरकारने किती खर्च केला याबद्दल श्वेतपत्रिका काढणार असं स्पष्ट केलं आहे. आता  राज्यावर ६ लाख ७१ हजार कोटीपेक्षा  कर्ज आहे, त्याचा आढावा घेतला जाईल, असं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच काही प्रकल्प बंद करण्याचे संकेतही त्यांनी दिलं.

आज  राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि जयंत पाटील हजर आहे. राज्यासाठी लवकरच महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहे. परंतु, त्याआधी राज्यावर तब्बल ६ लाख ७१ हजार कोटीपेक्षा जास्त कर्ज आहे. क्षमतेपेक्षा अधिक कर्ज घेतलं का? पायाभूत प्रकल्पांसाठी योग्य व्याजदरानं कर्ज घेतलं का, याचा अभ्यास केला जाईल, असं पाटील यांनी स्पष्ट केलं. तसंच  जे प्रकल्प योग्य नाहीत ते थांबवले जातील, विनाकारण प्रकल्प थांबवले जाणार नाहीत, असंही पाटील यांनी सांगितलं.

मागील सरकारने काही प्रकल्पांसाठी नुसते नारळं फोडले पण प्रत्यक्षात ते अजूनही सुरू झाले नाही. त्यासाठी अतिरिक्त निधी दिला आहे. या प्रकल्पांना उशीर का झाला, किती निधी दिला. या प्रकल्पांसाठी आणखी किती खर्च लागणार आहे, याबद्दल अभ्यास केला जाईल, असंही पाटील यांनी सांगितलं.

तसंच येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे खातेवाटप  करतील अस वाटतं.  मंत्रिमंडळ विस्तार यावर  ठाकरे भूमिका घेतील, असंही त्यांनी सांगितलं.

नव्या मंत्रिमंडळामध्ये अजित पवार यांना स्थान दिले जाईल का? असा सवाल विचारला असता. अजित पवार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल का याचा निर्णय सर्वस्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचाच आहे ते योग्य तो अंतिम निर्णय घेतील, तो सर्वांना मान्य आहे, असंही पाटील यांनी स्पष्ट केलं.

मंत्र्यांना दालन वाटप

दरम्यान, महाविकास आघाडीतील मंत्र्यांसाठी मंत्रालयात  दालन वाटप केले. आज दालन वाटप करताना सीएम यांच्या जवळील सहा मजलावरील  मुख्य इमारतीतील  दुसर मोठे आणि महत्त्वाचे दालन कोणास ही दिले नाही. त्याचे वाटप केलेल नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ खडसे, नंतर भाऊसाहेब फुंडकर हे वापरत असलेले दालन आता रिक्तच ठेवले आहे. हे दालन मुख्यमंत्री दालनानंतर सर्वात मोठे दालन, नव्याने सहा मंत्री शपथ धेतलेल्या पैकी कुणालाही दिलेले नाही. नवीन शपथविधीत हे रिक्त दालन कोणाला मिळणार का याकडे सर्वांचं  लक्ष लागलं आहे.

First Published: Dec 3, 2019 04:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading