मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /महत्त्वाची बातमी, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 2 दिवसात अतीमुसळधार पावसाचा इशारा

महत्त्वाची बातमी, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 2 दिवसात अतीमुसळधार पावसाचा इशारा

गुरुवारी आणि शुक्रवारी  कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गुरुवारी आणि शुक्रवारी कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गुरुवारी आणि शुक्रवारी कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

टोबर : राज्यभरात परतीच्या पावसाने धुमशान घातले आहे. पुढील आणखी दोन दिवस मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रामधील काही भागात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा  (Heavy to very heavy rains) अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी कोकणातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

येत्या 2 दिवसात राज्यात मराठवाडाच्या व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता आहे. याबाबत वेधशाळेनं पत्रक जारी केलेले आहे. त्याच्या पुढच्या 2 दिवसात म्हणजे, गुरुवारी आणि शुक्रवारी कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन दिवसांमध्ये मुंबई, ठाणे सहीत भागात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाजही कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस विचित्र अपघात, ट्रक-कंटेनरच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने थोडी उसंत घेतली होती. मात्र, वातावरण बदलल्याने पुन्हा पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा सर्वात जास्त फटका हा शेतकऱ्यांना बसणार आहे. सोयाबीनसह अनेक पिकं ही काढणीला आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगांना झाडावरच कोंबं फुटली आहेत. त्यामुळे सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातातून गेल्यात जमा आहे. भाजीपाला आणि इतर फळपिकांनाही त्याचा मोठा फटका बसला आहे.

'या' शेतकऱ्यांकडून सरकार परत घेणार दिलेले 6000 रुपये, तुम्ही या यादीत आहात का?

आता मजुरांची कमतरता असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. कोरोनाचं संकट, बाजारातली मंदी, मजुरांची कमतरता यामुळे मार्ग कसा काढायचा असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

तर, अवकाळी पावसामुळे कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कोकणातील प्रमुख पिकं असलेले भाताचे पिक अवकाळी पावसाने जमीनदोस्त झाले आहे. सोन्यासारखे शेतात वाढलेले आणि हातातोंडाशी आलेले भातपीक वादळी पावसाने अक्षरशः सडले आहे.

First published: