अखेर 19 पैकी 9 आमदारांचं निलंबन मागे

अखेर 19 पैकी 9 आमदारांचं निलंबन मागे

र्थसंकल्प सादर करताना गोंधळ घालणाऱ्या 19 पैकी 9 आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलंय

  • Share this:

01 एप्रिल : अर्थसंकल्प सादर करताना गोंधळ घालणाऱ्या 19 पैकी 9 आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलंय. संसदीय कामकाज मंत्री गिरीष बापट यांनी विधानसभेत ही घोषणा केली.

विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्प सादर करत असताना सभागृहात घातलेल्या गोंधळाप्रकरणी विरोधी पक्षातील 19 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. 31 डिसेंबरपर्यंत या 19 आमदारांना सभागृहात उपस्थित राहता येणार नाही. या आमदारांवर सभागृहाचा अवमान करणे आणि अर्थसंकल्पाच्या प्रती जाळणे असे आरोप ठेवण्यात आले होते. सरकारच्या या कारवाईचा निषेध करत विरोधकांनी सभात्याग केला होता.

अखेर विनियोजन विधेयकावर तडजोडीनंतर सरकारने नरमाईची भूमिका घेतली आणि 10 आमदारांचं निलंबन मागे घेण्याची तयारी दर्शवली. अखेर आज यापैकी 9 आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलंय.  या आमदारांना दीर्घकाळ सभागृहाबाहेर ठेवणं शोभनीय वाटत नाही, असं यावेळी गिरीश बापट म्हणाले.

यांचं झालं निलंबन मागे

1) संग्राम थोपटे, काँग्रेस  

2 )नरहरी झिरवळ, राष्ट्रवादी

3) दीपक चव्हाण, काँग्रेस

4) दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी  

5) अब्दुल सत्तार, काँग्रेस

6) अवधूत तटकरे, राष्ट्रवादी

7) अमित झनक, काँग्रेस

8) वैभव पिचड, राष्ट्रवादी

9) डी.पी. सावंत, काँग्रेस

 

First published: April 1, 2017, 2:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading