सुभाष देशमुख म्हणतात, कष्टाच्या पैशांने बंगला बांधला, कोर्टाने सांगितलं तर तोडून टाकेन !

सुभाष देशमुख म्हणतात, कष्टाच्या पैशांने बंगला बांधला, कोर्टाने सांगितलं तर तोडून टाकेन !

माझ्या नेत्यांनी मला सांगितलं तरच राजीनामा देणार असल्याचंही देशमुखांनी सांगितलं.

  • Share this:

मुंबई, 02 जून : मी कुणाचं घर किंवा जागा हडप केली नाही. महापालिकेची रितसर परवानगी घेऊनच कष्टाच्या पैशानेच बांधकाम केलंय असं स्पष्टीकरण सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिलंय. मंत्रिमंडळाने सांगितलं तर राजीनामाही देईन असंही देशमुखांनी सांगितलं.

सोलापूरमधील अनधिकृत बांधकाम प्रकरणामुळे सहकारमंत्री सुभाष देखमुख अडचणीत सापडले आहे.  सुभाष देशमुख यांचा होटगी रस्त्यावरील बंगला बेकायदेशीर असल्याचं उघड झालंय. अग्निशमन दलाच्या जागेवर बांधलेल्या बंगल्याबाबतचा अहवाल उच्च न्यायालयात सादर करण्यात आला आहे. मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी उच्च न्यायालयात अहवाल सादर केलाय.

सुभाष देशमुख यांनी यावर आपली बाजू मांडली.

मी कुणाचं घर, जागा हडपली नाही किंवा लुटली नाही कष्टाच्या पैश्याने बंगला बांधला. मी रितसर परवानगी घेऊन बांधकाम केलं. एकाच पदावरील व्यक्ती आधी बांधकाम परवाना देते आणि पुन्हा परत कशी घेते ? असा सवाल देशमुखांनी उपस्थित केला. तसंच या प्रकरणी मी न्यायालयात दादा मागणार आहे. न्यायालयाने सांगितले तर बंगला पाडेन आणि माझ्या नेत्यांनी मला सांगितलं तरच राजीनामा देणार असल्याचंही  देशमुखांनी सांगितलं.

नेमकं प्रकरण काय?

- सोलापुरातील होटगी रस्त्यावरील देशमुख यांचा बंगला

- महापालिकेची ही जागा अग्निशमन दलासाठी आरक्षित

- दोन एकरांपैकी 22 गुंठ्यांवर देशमुखांचा बंगला

- 2001मध्ये बंगल्याच्या बांधकामासाठी परवानगी नाकारण्यात आली

- देशमुख यांनी पुढील प्रत्येक बाबीला आपण जबाबदार असल्याचं प्रतिज्ञापत्र दिलं

- 2004मध्ये बांधकाम करण्यासाठी पालिकेकडून सशर्त परवाना

- 10 ऑगस्ट 2016मध्ये न्यायालयात जनहित याचिका

- प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश

- पालिका आयुक्त यांनी न्यायालयात सादर केला अहवाल...

संबंधीत बातम्या

फडणवीस सरकारच्या या मंत्र्याचा बंगला बेकायदेशीर, काय आहे प्रकरण ?

First published: June 2, 2018, 6:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading