Home /News /mumbai /

अविश्वास ठराव की ठाकरेंचा राजीनामा! आघाडी सरकार कोणत्या परिस्थितीत पडेल? 'या' आहेत शक्यता

अविश्वास ठराव की ठाकरेंचा राजीनामा! आघाडी सरकार कोणत्या परिस्थितीत पडेल? 'या' आहेत शक्यता

संख्येअभावी उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायचा निर्णय घेतला किंवा विधानसभेतील फ्लोअर टेस्ट हरले तरच महाराष्ट्रातील सध्याचे शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सरकार पडू शकते.

    मुंबई, 24 जून : शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात अस्थिरता निर्माण झाली आहे. सध्या गुवाहाटीत शिंदे गटासह शिवसेनेचे जवळपास 35 आमदार उपस्थित असून हा आकडा वाढत चालला आहेत. त्याचबरोबर अनेक बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांनी दावा केला आहे की त्यांना अपक्षांसह 50 आमदारांचा पाठिंबा आहे, ज्यामुळे त्यांचा गट "खरी शिवसेना" (Shivsena) बनतो. दुसरीकडे, ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने बुधवारी विधीमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित न राहिल्याने शिंदे कॅम्पमधील 12 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. त्यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यघटनेच्या 10 व्या अनुसूचीनुसार पक्षाचा व्हिप विधिमंडळाच्या कामकाजासाठी जारी केला जातो, बैठकीला उपस्थित राहण्यासाठी नाही. आमदारांची अपात्रता ही बहुधा महाराष्ट्राच्या राजकीय नाट्याच्या दुसऱ्या अध्यायाची सुरुवातीची घटना असू शकते. संख्येअभावी उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायचा निर्णय घेतला किंवा विधानसभेतील फ्लोअर टेस्ट हरले तरच महाराष्ट्रातील सध्याचे शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सरकार पडू शकते. म्हणूनच आम्ही तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणात घडणाऱ्या अशा संभाव्य घटनांबद्दल सांगणार आहोत. शिंदे गटाला भावनिक आवाहन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच पदावरून पायउतार होण्याचा प्रस्ताव दिला असून बुधवारी 'वर्षा' हे शासकीय निवासस्थान सोडल्यानंतर पुन्हा 'मातोश्री'वर दाखल झाले. शिंदे यांनी मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतची युती तोडण्याचा आग्रह धरला आहे. राजीनामा किंवा फ्लोर टेस्ट एकनाथ शिंदे आणि 50 आमदारांचा दावा आहे की त्यांनी ठाकरे सरकारला पाठिंबा काढून घेण्याबाबत महाराष्ट्राच्या राज्यपालांना अधिकृतपणे कळवले आहे. असे झाल्यास उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यास राज्यपाल बहुधा भाजपला सरकार स्थापन करण्याचे आवाहन करतील. यानंतर भाजपला विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. शिंदे यांच्या निष्ठावंत आमदारांच्या कथित पाठिंब्यावर भाजप पुढे जाऊ शकते. उद्धव ठाकरेंनी राजीनामा न दिल्यास त्यांना विधानसभेत फ्लोर टेस्टला सामोरे जावे लागेल. शिंदे गटाच्या नव्या दाव्याने आघाडीला मोठा धक्का? उपाध्यक्ष झिरवळ यांच्यावरच होणार कारवाई? प्रतिस्पर्धी गटांची संख्या पाहता मुख्यमंत्रिपदाची ही शक्यता धूसर आहे. जर ठाकरे फ्लोअर टेस्टमध्ये अपयशी ठरले तर सरकार पडेल, पुन्हा भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी बोलावले जाईल अशी परिस्थिती निर्माण होईल. पण भाजपला संख्या वाढवता आली नाही, तर नोव्हेंबर 2019 प्रमाणे राज्यात बहुधा राष्ट्रपती राजवट लागू होईल. या काळात सरकार स्थापनेचे पर्याय शोधले जातात आणि नवीन युती स्थापन करता येते. मात्र, हा गोंधळ कायम राहिल्यास राज्यात नव्याने विधानसभा निवडणुकाही होऊ शकतात. 'ठाकरे आणि शिवसेना हे नाव सोडून जगून दाखवा'; मुख्यमंत्र्यांचं बंडखोरांना आव्हान पक्षांतर विरोधी कायदा पक्षांतर विरोधी कायदा निर्वाचित प्रतिनिधींना दंड करतो जे अपात्रतेसह पक्ष बदलतात. खासदार आणि आमदारांची संख्या विधिमंडळात पक्षाच्या संख्याबळाच्या दोनतृतीयांशपेक्षा जास्त किंवा समान असल्यास ते कायद्याला बगल देऊ शकतात. त्यानंतर हा गट दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकतो किंवा सभागृहात वेगळा गट राहू शकतो. 288 सदस्यीय विधानसभेत शिंदे गटासह शिवसेनेचे 55 आमदार आहेत. पक्षांतरविरोधी नियमापासून सुरक्षित राहण्यासाठी शिंदे यांना किमान 36 आमदारांची गरज आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Eknath Shinde, Uddhav thacakrey

    पुढील बातम्या