EXIT POLL: वरळी विधानसभेतून आदित्य ठाकरेंना मिळणार का जनतेचा कौल?

EXIT POLL: वरळी विधानसभेतून आदित्य ठाकरेंना मिळणार का जनतेचा कौल?

288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. महायुतीला 243 जागा मिळतील, असं या Exit Poll चा निकाल सांगतो.

  • Share this:

मुंबई, 21 ऑक्टोबर : News18 Lokmat आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत भाजप- शिवसेना महायुतीला मोठं बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. महायुतीला 243 जागा मिळतील, असं या  Exit Poll चा निकाल सांगतो. हाती लागलेल्या Exit Poll नुसार वरळी मतदारसंघामध्येआदित्य ठाकरे बाजी मारणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पहिल्यांदाच विधानसभेत उमेदवारी मिळवणारे आदित्य ठाकरे बाजी मारणार आहेत. खरंतर वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.

2014 च्या विधानसभा निवणुकीत शिवसेनेचे सुनील शिंदे वरळीचे आमदार झाले. त्याआधी 2009 मध्ये सचिन अहिर आमदार झाले. आता सचिन अहिर यांच्या सेनाप्रवेशाचा आदित्य ठाकरेंना किती फायदा होतो हे या लढतीमध्ये कळेल.

वरळी विधानसभा निवडणूक 2014 निकाल

सुनील शिंदे, शिवसेना - 60 हजार 625

सचिन अहीर, राष्ट्रवादी - 37 हजार 613

हा आहे वरळी विधानसभा मतदारसंघाचा इतिहास

1962 – माधव नारायण बिरजे (काँग्रेस)

1967 – माधव नारायण बीरजे (काँग्रेस)

1972 – शरद शंकर दिघे ( काँग्रेस)

1978 - प्रल्हाद कृष्णा कुरणे (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया) (मार्क्सवादी)

1980 - शरद शंकर दिघे ( काँग्रेस)

1985 - विनिता दत्ता सामंत (अपक्ष)

1990, 1995, 1999, 2004 - दत्ताजी नलावडे (शिवसेना)

मतदारसंघ पुनर्रचना

2009 – सचिन अहिर (राष्ट्रवादी काँग्रेस)

2014 – सुनील शिंदे ( शिवसेना)

Published by: Manoj Khandekar
First published: October 21, 2019, 6:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading