Live Exit Poll : भाजप की शिवसेना, मुंबईत मोठा भाऊ कोण? मतदारांनी दिलं उत्तर

Live Exit Poll : भाजप की शिवसेना, मुंबईत मोठा भाऊ कोण? मतदारांनी दिलं उत्तर

News18 Lokmat आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत महायुतीला मोठं बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 21 ऑक्टोबर- महाराष्ट्र विधानसभा मतदारांनी कुणाच्या पारड्यात बहुमत टाकलंय हे 24 ऑक्टोबर म्हणजे गुरुवारी स्पष्ट होईल. News18 Lokmat  आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत महायुतीला मोठं बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. महायुतीला 243 जागा मिळण्याचा अंदाज EXIT POLL मध्ये वर्तवण्यात आला आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीला 41 जागा मिळतील, असं या Exit Poll चा निकाल सांगतो. News18 Lokmat च्या exit poll मध्ये पश्चिम महाराष्ट्र वगळता अन्य कुठेही आघाडीला जागांचा दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.

मुंबईत 33 जागांसाठी लढण्यात आलेल्या निवडणूकीत भाजप 17 आणि सेनेला 16 जागा मिळणार असा अंदाज EXIT POLL मध्ये वर्तवण्यात आला असून काँग्रेसला फक्त दोन जागा राखण्यात यश मिळेल तसंच राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही असं चित्र दिसतं. तर अपक्षाला एक जागा राखण्यात यश मिळाल्याचं EXIT POLL मध्ये सांगण्यात आलं.

ठाण्यात 17 जागांसाठी लढण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये भाजपला 9 आणि शिवसेनेला 8 जागा राखता आल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून ठाण्यात काँग्रेसला एकही जागा मिळाली नसून राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा राखण्यात यश मिळालं असून अपक्षाला एक जागा जिंकता आली.

लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही भाजप जोरदार मुसंडी मारणार असंच चित्र यामध्ये दिसत आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला शंभरी गाठता आली नव्हती. तर आता एक्झिट पोलमध्ये आघाडीला 41 जागा मिळतील असं समोर आलं आहे. तर भाजप शिवसेना युतीला तब्बल 243 जागा मिळण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना-भाजपला 2014 च्या तुलनेत 11 जागा जास्त मिळण्याची शक्यता आहे. यावेळी युतीला 43 तर आघाडीला 23 जागा मिळतील असं एक्झिट पोलमध्ये दिसत आहे.

2014 मध्ये मुंबई- ठाण्यात एकूण 54 जागांसाठी मतदान करण्यात आलं होतं. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ 2014 च्या निवडणुकीत भाजपकडे गेला. 2014 च्या निवडणुकीत युती आणि आघाडी तुटल्याने सगळी समीकरणं बदलली.

2014 निवडणूक

शिवसेना 20

भाजप 22

एनसीपी 04

कांग्रेस 05

सपा 01

अपक्ष 01

एमआईएम 01

2014 विधानसभा निवडणूक निकाल

संजय केळकर, भाजप - 70 हजार 884

रवींद्र फाटक, शिवसेना - 58 हजार 296

निरंजन डावखरे, राष्ट्रवादी - 24 हजार 320

मुंबई- ठाणे 2009 निवडणूक

शिवसेना 09

भाजप 08

एनसीपी 08

कांग्रेस 17

सपा 03

अपक्ष 01

एमएनएस 08

2014 च्या निवडणुकीत काय झालं?

2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. तर शिवसेनेलाही समाधानकारक जागा मिळाल्या होत्या.

या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अँटी एन्क्मबन्सीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे राज्यात 15 वर्षांपासून असलेली सत्ता आघाडीने गमावली. या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला 145 जागांचा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे नंतर भाजप-शिवसेनेनं पुन्हा एकत्र येत युतीचे सरकार स्थापन केलं.

महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण जागा आणि 2014 चं पक्षीय बलाबल

एकूण जागा - 288

भाजप - 122

शिवसेना - 63

काँग्रेस - 42

राष्ट्रवादी - 41

EXIT POLL: वरळी विधानसभेतून आदित्य ठाकरेंना मिळणार का जनतेचा कौल?

Exit Poll 2019: उत्तर महाराष्ट्रात यंदाही फुलणार 'कमळ' तर आघाडीचा सुपडा साफ

EXIT POLL : पश्चिम महाराष्ट्रात युती 'आघाडी'वर, काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा फटका

मराठवाड्यातही भाजप-शिवसेना 'पैलवान', आघाडीला दाखवले आस्मान?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2019 06:56 PM IST

ताज्या बातम्या