मुंबई, 14 जुलै : राज्यात कोरोनाचा (COVID-19) संसर्ग आणखी वाढू नये म्हणून परदेशातून आणि परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांना (passengers) कडक नियमावली लागू करण्यात आली आहे. पण, आता महाराष्ट्रात हवाई मार्गे येणाऱ्या प्रवाशांनी कोरोनाचे दोन डोस (corona vaccine) घेतले असतील तर परवानगी दिली जाणार आहे, अशी महत्त्वाची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी दिली.
कोरोनाची परिस्थिती पाहता राज्यात येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी करणे गरजेचं होतं. पण, आता राज्यात कोरोनाची परिस्थितीत आटोक्यात आल्यानंतर निर्बंध शिथिल करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. यावेळी हवाई मार्ग राज्यात येणाऱ्या प्रवाशांबद्दल महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
पळून पळून किती पळणार! अशा ठिकाणी दिली कोरोना लस ज्याचा कुणी विचारही केला नसेल
'हवाई मार्गे महाराष्ट्रात येणाऱ्या व्यक्तीनी लशीचे दोन डोस घेतले असतील तर परवानगी आहे. RTPCR टेस्ट ऐवजी ज्यांनी लसीकरणाचे 2 डोस घेतले असतील ते प्रमाणपत्र दाखवले तर हवाई मार्गे महाराष्ट्रात यायला परवानगी आहे, असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रातून डेल्टा प्लस हद्दपार!
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वर्तवली जात असताना कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण राज्यात आढळून आल्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती. पण, जुलै महिन्यात मोठा दिलासा मिळाला आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत असताना राजेश टोपे यांनी 'राज्यात कुठे ही डेल्टा प्लसचा नवा रुग्ण राज्यात आढळलेला नाही. प्रत्येक जिल्ह्यांतून 100 नमुने तपासणी सुरू आहे. मागील महिन्यात 21 रुग्ण आढळले होते. पण आता नवीन रुग्ण आढळले नाही' असं सांगितलं आहे.
जून महिन्यात राज्यात डेल्टा प्लसचे एकूण 21 रुग्ण असून डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळून आले होते. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला होतो. त्यानंतर राज्य सरकारने 36 जिल्ह्यांतून सॅम्पल तपासणीसाठी पाठवले होते आणि डेल्टा प्लसच्या रुग्णांसाठी आवश्यक ती काळजी घेतली जात होती. अखेरीस राज्य सरकारच्या या लढ्याला यश आले आहे.
'राज्यात निर्बंध शिथिल नाही'
तसंच, 'राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या देशाच्या तुलनेत कमी आहे. गेल्या 3 आठवड्यात रुग्ण संख्या स्थिर आहे. पण 10 जिल्ह्यांमध्ये 92 टक्के रुग्ण आहे. त्यामुळे लेव्हल ३ मध्ये अनेक जिल्हे आहे. त्यामुळे राज्यात निर्बंध शिथिल करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही', असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Airport