• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • Exclusive : ठाण्याच्या धाडसी अधिकारी कल्पिता पिंपळेंचं तुटलेलं एक बोट पुन्हा जोडलं; मात्र...

Exclusive : ठाण्याच्या धाडसी अधिकारी कल्पिता पिंपळेंचं तुटलेलं एक बोट पुन्हा जोडलं; मात्र...

तुटलेलं बोट पुन्हा जोडण्यात आलं आहे. मात्र आधीसारखं त्या आपल्या हाताचा वापर करू शकतील का?

  • Share this:
ठाणे, 1 सप्टेंबर : ठाण्यातील (Thane) सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे (Kalpita Pimple Assistant Commissioner, Thane,) या महिला अधिका-याने आपलं एक बोट कायमचं गमावलं असून त्यांच्या उजव्या हाताचे मनगट देखील गंभीररित्या जखमी झाले आहे. त्यामुळे भविष्यात ठाणे महानगरपालिकेच्या धाडसी महिला अधिकारी कल्पिता पिंपळे यांना त्यांच्या दोन्ही हाताचा सर्वसामान्यपणे वापर करता येणार नसल्याचं सांगितलं जात आहे. ठाण्याच्या ज्युपिटर हाॅस्पिटलमध्ये त्यांच्यावर आणि सुरक्षा रक्षक सोमनाथ पालवेवर उपचार सुरू आहेत. शस्त्रक्रिया तज्ज्ञ डाॅक्टर पराग लाड आणि प्लास्टिक शस्त्रक्रिया तज्ज्ञ डाॅक्टर व्यंकटेशवरन यांच्या देखरेखेखाली हे उपचार सुरु आहेत. ज्या दिवशी सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि सुरक्षा रक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर अमरजित यादव याने हल्ला केला त्याच रात्री या दोघांना वेंदात हाॅस्पिटल येथे दाखल करण्यात आले पण नंतर काही वेळातच शस्त्रक्रियेकरता ज्युपिटर हाॅस्पिटल मध्ये दोघांनीही हलवण्यात आले आणि रात्री ९ च्या सुमारास दोघांवर शस्रक्रिया सुरु करण्यात आली ही शस्रक्रिया जवळपास ७ तास चालली आणि पहाटे ४ च्या सुमारास संपली. सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपेळ यांच्या डाव्या हाताची करंगळी पुर्णता: तुटली आहे. त्यावर शस्त्रक्रिया करुन टाके घालण्यात आले आहेत तर करंगळीच्या बाजूचे बोट देखील तुटले आहे. सुदैवाने तुटलेले बोट मिळाल्याने ते बोट जोडण्यात आलं आहे. तर अंगठ्यासह इतर दोन बोटांना इजा झालीये त्यामुळे संवेदना निर्माण करणा-या आणि रक्त पुरवठा करणाऱ्या नसा बाधित झाल्या होत्या. त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. हे ही वाचा-Video: ठाण्यात मनसैनिक पुन्हा आक्रमक, अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात कल्पिता पिंपळे यांच्या उजव्या हातावर देखील अमिरजीत यादवने वार केला असून, मनगटाला हालचाल करण्यास सूचना देणा-या नसा या हल्ल्यात बाधित झाल्या आलेत. तर सुरक्षा रक्षक सोमनाथ पालवे यांचा डाव्या हाताच्या अंगठ्याच्या बाजूचे म्हणजेच तर्जनी बोट मधून तुटलय. या तुटलेल्या बोटाचा तुकडा न मिळाल्याने बोटाला टाके घालून प्लास्टिक सर्जरी करण्यात आली आहे. कल्पिता पिंपळे यांना पुन्हा शस्त्रक्रियेची गरज लागू शकते, असं समोर आलं आहे. दुर्देव म्हणजे कल्पिता पिपंळे या त्यांच्या दोन्ही हातांचा वापर पहिल्या सारखा करु शकणार नाही, असच दिसतय. काय झालं होतं त्या दिवशी? ठाणे महापालिकेकडून सध्या शहरातील अनाधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाईची मोहिम उघडली होती. यावेळी माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यासह त्यांच्या पथकाने घोडबंदर भागातील कासारवडवली येथील मार्केटवर कारवाई केली होती. त्यावेळी फेरीवाल्यांनी त्यांचा रस्ता अडवला. यावेळी फेरीवाले आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये संघर्ष पेटला. त्याचवेळी यादव नावाच्या या भाजीविक्रेत्याने रागाच्या भरात पिंगळे यांच्यावर चाकू फेकून मारला. पिंगळे यांनी तो हल्ला रोखण्यासाठी हाताने अडकवला. पण, यात त्यांची तीन बोट छाटली गेली. त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या सुरक्षारक्षकाने धाव घेतली असता आरोपी यादवने त्याच्यावरही वार केले. या हल्ल्यात त्याचेही बोट तुटले.
Published by:Meenal Gangurde
First published: