मुंबई विद्यापीठाचे निकाल 31 जुलैलाच; वाणिज्य,लॉ शाखेचे निकाल मात्र लांबणीवर

मुंबई विद्यापीठाचे निकाल 31 जुलैलाच; वाणिज्य,लॉ शाखेचे निकाल मात्र लांबणीवर

त्यात वाणिज्य शाखेच्या तब्बल २ लाख ७१ हजार ७०० उत्तरपत्रिकांची तपासणी रविवारी सकाळपर्यंत बाकी होती.

  • Share this:

मुंबई, 30 जुलै:  मुंबई विद्यापीठाच्या कला ,विज्ञान ,टेक्नोलॉजी आणि मॅनेजमेंट या शाखांचे 98 टक्के पेपर तपासून झाले असून या शाखांचा निकाल 31 जुलैलाच लागणार असण्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव एम.ए. खान यांनी दिली आहे. वाणिज्य आणि लॉ शाखेच्या विद्यार्थ्यांना मात्र निकालासाठी दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे. मुंबई विद्यापीठाचे निकाल जाहीर करण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी ३१ जुलै ही डेडलाईन दिली होती.

30 जुलैला  तब्बल ३ लाख ३५ हजार उत्तरपत्रिका तपासून सोमवारी निकाल जाहीर करण्याचं आव्हान मुंबई विद्यापीठासमोर होतं. त्यात वाणिज्य शाखेच्या तब्बल २ लाख ७१ हजार ७०० उत्तरपत्रिकांची तपासणी  रविवारी सकाळपर्यंत  बाकी होती. त्यामुळे वाणिज्य शाखेचा तसंच लॉ शाखेचा निकाल 31 जुलैला लागणार नाही असं कुलसचिवांनी सांगितलं आहे.

शनिवारी एकूण ७० हजार उत्तरपत्रिकांची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये ३३ हजार उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून, ३७ हजार उत्तरपत्रिकांचं मॉडरेशन पूर्ण झालं होतं.

First published: July 30, 2017, 10:47 AM IST

ताज्या बातम्या