प्रेयसीला भेटण्यासाठी आला होता प्रियकर.. घटस्फोटीत पतीने केले सपासप वार

भायखळा भागात राहणारा समिउल्लाह फारुकी हा आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी शिवाजीनगरला आला होता.

News18 Lokmat | Updated On: Aug 12, 2019 06:47 PM IST

प्रेयसीला भेटण्यासाठी आला होता प्रियकर.. घटस्फोटीत पतीने केले सपासप वार

मुंबई, 12 ऑगस्ट- मुंबईतील गोवंडी परिसरात 23 वर्षीय तरूणाची निर्घृण हत्या करण्यात आली. शनिवारी पहाटे ही घटना घडली. समिउल्लाह फारुकी असे हत्या करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी 27 वर्षीय झुबेर खान याला अटक केली आहे.

प्रेयसीला भेटायला आला होता..

मिळालेली माहिती अशी की, भायखळा भागात राहणारा समिउल्लाह फारुकी हा आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी शिवाजीनगरला आला होता. त्यावेळी झुबेर खानसह चार-पाच जणांनी त्याच्यावर चाकूने सपासप वार करून त्याची हत्या केली. समिउल्लाह फारुकी याची प्रेयसी झुबेर खान याची घटस्फोटीत पत्नी आहे.

झुबेरने गेल्या वर्षी त्याच्या पत्नीला घटस्फोट दिला होता. घटस्फोटीत पत्नीचे प्रेम प्रकरण सुरू असल्याचे झुबेरला समजले होते. समिउल्लाह तिला भेटण्यासाठी आल्याचे पाहून झुबेर संतापला. झुबेर आणि त्याच्या साथीदारांनी समिउल्लाह याला बेदम मारहाण केली नंतर त्याच्या पोटावर, पाठीवर चाकूने सपासप वार केले. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले. मात्र, मालवणी पोलिसांनी अवघ्या तीन तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

मुंबईत प्रसिद्ध दिग्दर्शकाची निर्घृण हत्या..

Loading...

प्रसिद्ध दिग्दर्शक क्रिशनेनंदू चौधरी (वय-37) यांची निर्घृण हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. क्रिशनेनंदू चौधरी यांचा मृतदेह बेडशीटमध्ये बांधलेल्या अवस्थेत विरारच्या खणीवडे खाडीत सापडला. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मोहम्मद फुरकान ( वय-38, रा. मालाड) असे आरोपीचे नाव आहे.

क्रिशनेनंदू चौधरी हे मुंबईतील गोरेगाव भागात राहत होते. ते लग्न, फिल्म स्टुडिओ याठिकाणी डेकोरेशनचे डिझाईन करणारे प्रसिद्ध डायरेक्टर होते. गेल्या बुधवारी (7 ऑगस्ट) रात्री आठ वाजेपासून ते बेपत्ता होते. त्यांच्या एका रुममेटने मालाडमधील मालवणी पोलिस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. मात्र, शुक्रवारी (9 ऑगस्ट) त्यांचा मृतदेह बेडशीटमध्ये बांधलेल्या अवस्थेत विरारमधील खाडीत आढळला होता. क्रिशनेंदू चौधरी हे चित्रपट, मालिका, व्हीआयपी लग्न सोहळे यांच्या सेटचे डिझाईन तयार करत होते. चौधरी डिझाईन तयार करुन आरोपी मोहम्मद फुरकान याला देत होते. मोहम्मद फुरकान हा सेट उभारण्याचे काम करतो.

क्रिशनेनंदू चौधरी आणि आरोपी मोहम्मद फुरकान याच्यात मागील काही दिवसांपासून पैशावरून वाद सुरू होता. क्रिशनेनंदू यांचे 85000 हजार रूपये फुरकानकडे अडकले होते. सात ऑगस्ट रोजी या दोघांची भेट झाली. याच वेळी दोघांचा वाद विकोपाला गेला. आरोपी फुरकान आणि त्याच्या दोन साथीदारांनी मिळून क्रिशनेंदू यांना मालाड पश्चिमेकडील आर्यलँड भागात नेले. तिथे त्यांच्यावर धारदार चाकूने सपासप वार करून त्यांनी ठार मारले. नंतर त्यांचा मृतदेह बेडशीटमध्ये बांधून रात्री उशिरा एका कारमध्ये टाकून तो विरार खणीवडे येथील खाडीत फेकून दिला. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांची 3 स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. मुख्य आरोपी मोहम्मद फुरकान याचे दोन साथीदार पसार झाले आहेत. त्यांचा शोध सुरु घेण्यासाठी पोलीस रवाना झाले आहेत.

'तो' पाठीमागून आला आणि 5 वेळा घातले डोक्यात फावडे, हत्येच्या घटनेचा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 12, 2019 04:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...