एन्काउंटर फेम प्रदीप शर्मांनी केला पदाचा दुरुपयोग, हितेंद्र ठाकूर गटाचा पलटवार

एन्काउंटर फेम प्रदीप शर्मांनी केला पदाचा दुरुपयोग, हितेंद्र ठाकूर गटाचा पलटवार

शर्मा या एका व्यक्तीने आता पर्यंत कोणाच्या विरोधात लढाई लढली नाही. जे काही केलं ते त्यांनी राज्यसरकारच्या ताकतीने केलं.

  • Share this:

विजय देसाई, नालासोपारा16 सप्टेंबर :  शिवसेनेत प्रवेश केलेले माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी केलेल्या टीकेला बहुजन विकास आघाडीने आता रोख ठोक उत्तर द्यायला सुरवात केलीय. माजी उपमहापौर उमेश नाईक यांनी प्रदीप शर्मा यांच्यावर पलटवार केलाय. ते म्हणाले, शर्मा मुळात त्यांचे गाव सोडून इकडे आलेत ते काय कोणाला सोडायला लावणार. त्याचं जे म्हणणं आहे हा त्यांचा गैरसमज आहे. शर्मा या एका व्यक्तीने आता पर्यंत कोणाच्या विरोधात लढाई लढली नाही. जे काही केलं ते त्यांनी राज्यसरकारच्या ताकतीने केलं. कायद्याच्या ताकतीने केलं. त्यांनी पदाचा दुरुपयोग केला होता. त्याची त्यांना काही प्रमाणात शिक्षाही भोगावी लागली. प्रदीप शर्मा यांच्या विरोधात राज्यसरकारने अपील केलं असून त्याचा निर्णय व्हायचा आहे. त्यामुळे शर्मांनी अशा वल्गना करू नये असा पलटवारही नाईक यांनी केला आहे. काजूपाडा येथे विविध कामांच्या भूमिपूजनाच्या वेळी ते बोलत होते.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे अजुन 70 आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक - महाजन

काय म्हणाले होते प्रदीप शर्मा

नालासोपारा विधानसभेचे शिवसेनेचे भावी उमेदवार प्रदीप शर्मा यांनी शिवसेना प्रवेशानंतर पहिल्याच एन्ट्रीला 2000 बाईक्स, 100 कार, 40 रिक्षा घेऊन विरार फाटा ते नालासोपारा (पच्छिम) अशी रॅली काढली. 'आम्ही दाऊदला मुंबई सोडायला लावली असून इथे कोण दादागिरी करेल, त्यालाही मुंबई सोडायला लावू', असा टोला प्रदीप शर्मा यांनी वसई-विरारमध्ये 28 वर्षांची एकहाती सत्ता असलेल्या आमदार हितेंद्र ठाकुराना नाव न घेता लगावला आहे.

दिवाळीच्या आधी सुरू होतेय अमेझाॅनची 'फेस्टिव यात्रा', ग्राहकांसाठी 'या' ऑफर्स

येथे नळाला पाणी नाही तर लोकांच्या घरात येते...

विरारमध्ये एन्काऊंटर फेम प्रदीप शर्मा यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजीने परिसर दुमदुमून गेला होता. भरपावसात ही रॅली काढण्यात आली. येथे नळाला पाणी येत नाही तर लोकांच्या घरात पाणी येत असल्याचे शर्मा यांनी आपल्या भाषणात सांगितले. प्रदीप शर्मा यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. ते आगामी विधानसभेचे संभाव्य उमेदवार आहेत. वसई-विरारमध्ये सर्व भूमिपुत्र एकत्र आले असून शर्मा यांचा विजय निच्छित असल्याचा दावा आगरी सेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष जनार्धन पाटील यांनी केला आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 16, 2019, 8:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading