मुंबई 25 मे: राज्यात कोरोनाची स्थिती बिकट असताना राजकीय पातळीवरही वातावर तापलं आहे. आज अनेक बड्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यात खासदार नारायण राणे यांचाही समावेश होता. राज्यपालांच्या भेटीनंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राज्यातली स्थिती हाताबाहेर जात आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी त्यांनी केली.
राणे म्हणाले, राज्यपालांशी कोरोनाच्या स्थितीवर चर्चा केली. ठाकरे सरकारला परिस्थिती हाताळता येत नाही. परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे.
रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने मुंबईतले महानगरपालिकेचे हॉस्पिटल्स हे लष्काराच्या ताब्यात दिले पाहिजेत. हे सरकार अपयशी ठरलंय. नाचता येईना अंगण वाकडे अशीस्थिती आहे अशी टीकाही त्यांनी केली.
सांगा कशी आवरायची ही गर्दी? काँग्रेसच्या मोफत धान्यवाटप कार्यक्रमाचा VIDEO व्हाय
दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप नेत्यांच्या राजभवनातील बैठका वाढल्या आहेत. त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेलं बैठकीचं आमंत्रण, त्यात मिलिंद नार्वेकर यांची हजेरी. एवढंच काय तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांची घेतलेली भेट, नंतर 'सामना'तून राज्यपालांवर केलेली आगपाखड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी स्वत: राज्यपालांची भेट घेतली आहे. आता भाजप नेते नारायण राणे राज्यपालांच्या भेटीला गेल्याने रोजदार राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
राज्यात सत्ताकेंद्र हा नेहमी 'वर्षा' बंगला असतो, पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून बहुतांस कामकाज 'मातोश्री' येथून चालले, आता राजभवन ही एक सत्ता केंद्र झाले. वरिष्ठ राज्यकीय नेते मंडळी गाठीभेटी तर होतातच त्याचवेळी सचिव दर्जा अधिकारी बैठका होत आहेत.
अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत वाद रंगल्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी केला खुलासा
भाजप नेते, सीएम अथवा कॅबिनेट मंत्री भेट निवेदन न देता राज्यपाल यांना देतात यातूनच भाजपने अप्रत्यक्ष राजभवन सत्ता केंद्र पर्याय उपलब्ध केला आहे. अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे.